advertisement

IND vs ENG : वानखेडेवर मुंबई इंडिअन्सचा प्लेयर देणार टीम इंडियाला धोका! सूर्याच्या लक्षात आला नाही इंग्लंडचा 'माईंड गेम'

Last Updated:

IND vs ENG 1st Semifinal : विल जॅक्स हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग असल्याने त्याला वानखेडेच्या मैदानाची खडानखडा माहिती आहे.

IND vs ENG 1st Semifinal
IND vs ENG 1st Semifinal
IND vs ENG Sam Curran Press Conference : टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या दुसऱ्या सेमी फायनलपूर्वी इंग्लंडचा ऑलराउंडर सॅम करन याने प्रेस कॉन्फरेन्स घेतली. यावेळी सॅमने भारतीय टीमला इशारा दिला असून आपली टीम या मोठ्या लढतीसाठी पूर्णपणे तयार असल्याचं म्हटलं आहे. 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या हाय-व्होल्टेज मॅचमध्ये इंग्लंड आपला 'परफेक्ट गेम' खेळण्याचा प्रयत्न करेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. करनच्या मते, ही मॅच हाय-स्कोअरिंग होण्याची दाट शक्यता असून दोन्ही टीम्समध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. यावेळी त्याने असं एक स्टेटमेंट केलं, ज्याचा विचार टीम इंडियानेही केला नसेल.

जॉस बटलर पुनरागमन करेल - सॅम करन

इंग्लंडचा माजी कर्णधार जॉस बटलर सध्या खराब फॉर्मशी झुंज देत असला तरी, सॅम करनला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. बटलर हा अनेक वर्षांपासून जागतिक दर्जाचा खेळाडू राहिला असून बुधवारी होणारी ही रात्र त्याचीच असेल, अशी आशा करनने व्यक्त केली आहे. बटलरच्या धावांच्या दुष्काळाबाबत टीममध्ये कोणतीही चिंता नसून तो मोठ्या मॅचमध्ये नक्कीच पुनरागमन करेल, असा विश्वास सॅम करनने बोलून दाखवला. यावेळी त्याने सूर्यकुमारच्या लक्षात नसलेली गोष्ट सांगितली.
advertisement
advertisement

वानखेडेची खडानखडा माहिती 

फॉर्मात असलेल्या विल जॅक्सचं कौतुक करताना करन म्हणाला की, जॅक्स हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग असल्याने त्याला वानखेडेच्या मैदानाची खडानखडा माहिती आहे. या अनुभवाचा फायदा इंग्लंडला सेमी फायनलमध्ये नक्कीच होईल, कारण स्थानिक परिस्थितीचा अंदाज असणारा खेळाडू टीमसाठी नेहमीच 'एक्स फॅक्टर' ठरू शकतो. बिगर-आशियाई देशांनी येथील परिस्थितीशी ज्याप्रकारे जुळवून घेतलं आहे, ते कौतुकास्पद असल्याचेही सॅम करनने म्हटलं आहे.
advertisement

इंग्लंडचा 'परफेक्ट गेम'

दरम्यान, सॅम करनच्या मते या स्पर्धेतील सर्वोत्तम 4 संघ सध्या सेमी फायनलमध्ये पोहोचले असून कोणालाही कमी लेखता येणार नाही. मुंबईत होणाऱ्या या 5 व्या मॅचमध्ये पावसाचा कोणताही अडथळा नसल्याने प्रेक्षकांना दोन्ही बाजूने चौकार आणि सिक्सचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. आता इंग्लंडचा हा 'परफेक्ट गेम' भारताला रोखू शकतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : वानखेडेवर मुंबई इंडिअन्सचा प्लेयर देणार टीम इंडियाला धोका! सूर्याच्या लक्षात आला नाही इंग्लंडचा 'माईंड गेम'
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All

ताज्या बातम्या

    आणखी पाहा
    advertisement