advertisement

आखाती देशात नातेवाईक अडकलेत... अनेकांचे फोन-मेसेज, CM फडणवीसांचा मोठा निर्णय

Last Updated:

दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे. या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement

भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
advertisement

नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क, दूतावासांशी समन्वय

महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आपत्कालीन संपर्क तपशील
रामल्लाह (पॅलेस्टाईन)
फोन : +970592916418
ईमेल : repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in
दोहा (कतार)
फोन : 00974-55647502
ईमेल : cons.doha@mea.gov.in
रियाध (सौदी अरेबिया)
advertisement
फोन : 00-966-11-4884697
WhatsApp : 00-966-542126748
टोल फ्री : 800 247 1234
ईमेल : cw.riyadh@mea.gov.in
तेल अवीव (इस्रायल)
फोन : +972-54-7520711 / +972-54-2428378
ईमेल : cons1.telaviv@mea.gov.in
तेहरान (इराण)
फोन : +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359
अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री : 800-46342
WhatsApp : +971543090571
ईमेल : pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in
advertisement
कुवैत
फोन : +96565501946
ईमेल : community.kuwait@mea.gov.in
बाहरीन
फोन : 00973-39418071
मस्कत
टोल फ्री : 80071234
WhatsApp : +96898282270
ईमेल : cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in
जॉर्डन
फोन : 00962-770 422 276
बगदाद (इराक)
फोन : +964 771 651 1185 / +964 770444 4899
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आखाती देशात नातेवाईक अडकलेत... अनेकांचे फोन-मेसेज, CM फडणवीसांचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement