advertisement

Gold Price Prediction: सोनं 3 लाखाचा दर गाठणार! युद्धाच्या घमासानात एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज, काय म्हणाले नेमकं?

Last Updated:

Gold Price Prediction : सोन्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यताही एक्सपर्टने वर्तवली आहे. सोन्याच्या दराबाबत आता सामान्यांना धडकी भरवणारा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सोनं 3 लाखाचा दर गाठणार! युद्धाच्या घमासानात एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज, काय म्हणाले नेमकं?
सोनं 3 लाखाचा दर गाठणार! युद्धाच्या घमासानात एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज, काय म्हणाले नेमकं?
Gold Price Prediction:  इराणविरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेने पुकारलेल्या युद्धाचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवरही पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. इक्विटी मार्केट ते कमोडिटी मार्केट, रिअल इस्टेटवरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. मात्र, युद्ध संपल्यानंतर शेअर बाजार ते कच्चं तेल, रिअल इस्टेट हे पूर्वीप्रमाणे सामान्य पातळीवर येतील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्याच वेळी सोन्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यताही एक्सपर्टने वर्तवली आहे. सोन्याच्या दराबाबत आता सामान्यांना धडकी भरवणारा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
इराण-अमेरिका युद्धाच्या धगधगत्या ज्वाळा आता जागतिक अर्थव्यवस्थेला चटके देऊ लागल्या आहेत. शेअर बाजार आणि कच्च्या तेलाच्या किमतीत अस्थिरता असतानाच, सोन्याच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक अंदाज समोर आला आहे. 'जेफरीज'चे (Jefferies) ग्लोबल हेड क्रिस वुड यांनी भाकीत केले आहे की, येत्या काळात सोन्याचे दर सध्याच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतात.

सोनं प्रति औंस १०,००० डॉलर्सवर?

advertisement
ख्रिस वुड यांनी 'ईटी नाऊ'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भू-राजकीय तणाव आणि जागतिक मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची होणारी प्रचंड खरेदी यामुळे सोने सध्या 'सुपर बुल रन'मध्ये आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पुढील पाच वर्षांत सोन्याचे भाव १०,००० डॉलर्स प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतात. सध्या भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १.६५ लाख रुपयांच्या वर आहेत; जर हा अंदाज खरा ठरला, तर लवकरच भारतात सोन्याचा भाव ३ लाख रुपये प्रति तोळा ओलांडू शकतो.
advertisement

युद्धाचा भडका आणि सोन्याची झळाळी

पश्चिम आशियातील युद्धाने सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ केली आहे. एलारा कॅपिटलच्या रिपोर्टनुसार, तणाव अधिक वाढल्यास सोने त्वरित ६,००० डॉलर्स प्रति औंसचा टप्पा गाठू शकते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध लांबण्याचे संकेत दिल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत आहेत. जेव्हा जेव्हा जगात अनिश्चितता येते, तेव्हा गुंतवणूकदारांचा विश्वास सोन्यावर अधिक वाढतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.
advertisement

म्युच्युअल फंडापेक्षाही वेगवान परतावा?

साधारणपणे १२ टक्के परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडाला गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी ६ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, ख्रिस वुड यांच्या दाव्यानुसार सोन्यातील वाढ यापेक्षाही वेगवान असू शकते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरमधील चढ-उतार सोन्याच्या या तेजीला अधिक खतपाणी घालत आहेत.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. गुंतवणूक अथवा सोनं खरेदी-विक्रीबाबत कोणताही सल्ला नाही. गुंतवणूक आणि खरेदी-विक्रीबाबत आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा. )
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price Prediction: सोनं 3 लाखाचा दर गाठणार! युद्धाच्या घमासानात एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज, काय म्हणाले नेमकं?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement