advertisement

2026 मध्ये 4 ग्रहण! पण आजच ग्रहण सर्वात खास का? कारण वाचून तुम्हीही व्हाल शॉक

Last Updated:

2026 हे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणीच आहे, कारण या वर्षात एकूण 4 ग्रहणे होणार आहेत. ज्यामध्ये 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण आहेत. मात्र, या सर्वांमध्ये आजचे चंद्रग्रहण सर्वात जास्त महत्त्वाचे आणि खास मानले जात आहे.

News18
News18
Chandra Grahan 2026 : 2026 हे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणीच आहे, कारण या वर्षात एकूण 4 ग्रहणे होणार आहेत. ज्यामध्ये 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण आहेत. मात्र, या सर्वांमध्ये आजचे चंद्रग्रहण सर्वात जास्त महत्त्वाचे आणि खास मानले जात आहे. पण असं का आणि आजच चंद्रग्रहण इतकं खास का मानलं जात आहे? यामध्ये धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत.
भारतात दिसणारे एकमेव चंद्रग्रहण
2026 मध्ये होणाऱ्या 4 ग्रहणांपैकी हे एकमेव चंद्रग्रहण आहे जे भारतातून दिसणार आहे. इतर तिन्ही ग्रहणे म्हणजेच 17 फेब्रुवारीचे सूर्यग्रहण, 12 ऑगस्टचे सूर्यग्रहण आणि 28 ऑगस्टचे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाहीत. त्यामुळे धार्मिक आणि शास्त्रीयदृष्ट्या भारतीयांसाठी हे ग्रहण सर्वात मोठे आहे. आज दिसणारे ग्रहण हे खगोलप्रेमींसाठी खूप खास ठरणार आहे.
advertisement
रक्तासारखा लाल 'ब्लड मून'
आजचे ग्रहण हे केवळ चंद्रग्रहण नसून ते 'खग्रास चंद्रग्रहण' आहे. जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येतो, तेव्हा तो काळसर न दिसता गडद तांबूस किंवा लाल रंगाचा दिसतो. यालाच वैज्ञानिक भाषेत 'ब्लड मून' म्हणतात. हे दृश्य पाहणे खगोलप्रेमींसाठी एक मोठी पर्वणी असते.
होळी आणि ग्रहणाचा दुर्मिळ योग
आजचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे हे ग्रहण होळीच्या दिवशी आले आहे. तब्बल 122 वर्षांनंतर असा योग जुळून आला आहे की, होळीच्या सणाला चंद्रग्रहणाचे सावट आहे. यामुळेच यंदा धुळवड खेळायची की नाही आणि होलिका दहन कधी करायचे, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू होती.
advertisement
खगोलशास्त्रीय 'ग्रस्तोदित' स्थिती
आजचे ग्रहण भारतात 'ग्रस्तोदित' स्वरूपात दिसणार आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा आपल्याकडे चंद्र उगवेल, तेव्हा तो आधीच ग्रहणाच्या स्थितीत असेल. त्यामुळे चंद्रोदयाच्या वेळीच आपल्याला लाल रंगाचा चंद्र पाहता येईल, जे अतिशय दुर्मिळ असते. शास्त्रानुसार, पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा ग्रहण लागते, तेव्हा चंद्राची शक्ती क्षीण होते. सिंह राशीत होणाऱ्या या ग्रहणाचा मानवी मनावर मोठा परिणाम होतो, असे ज्योतिषतज्ज्ञ मानतात. आज होळी असूनही ग्रहणामुळे अनेक मंदिरांचे दरवाजे दुपारी बंद राहतील आणि लोक नामस्मरणावर भर देत आहेत.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
2026 मध्ये 4 ग्रहण! पण आजच ग्रहण सर्वात खास का? कारण वाचून तुम्हीही व्हाल शॉक
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement