रितेश देशमुख काय म्हणाला?
‘वडापाव’चा ट्रेलर पाहिल्यानंतर रितेश देशमुख खूपच प्रभावित झाला. तो म्हणाला, “‘वडापाव’चा ट्रेलर पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटलं. या चित्रपटात एक उत्तम कथा, दिग्दर्शन आणि अभिनय पाहायला मिळतोय. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा!” त्याने दिग्दर्शक प्रसाद ओकचं खास अभिनंदन केलं आणि म्हणाला की, प्रसाद एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार आहे. त्याच्या कामात एक नवा दर्जा दिसतो.
advertisement
रितेशने निर्माता अमेय खोपकरचीही खूप स्तुती केली. तो म्हणाला, “अमेय खोपकर आणि माझी जुनी ओळख आहे. आम्ही मराठी चित्रपटसृष्टीत एकत्र सुरुवात केली. कुठलंही काम शंभर टक्क्यांपेक्षा जास्त कसं करायचं, हे अमेयजींकडून शिकावं. मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात प्राधान्य मिळावं, यासाठी ते नेहमीच झटत असतात.”
२ ऑक्टोबरला मिळणार ‘वडापाव’ची चव!
प्रसाद ओक दिग्दर्शित ‘वडापाव’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओकसोबतच अभिनय बेर्डे, गौरी नलावडे आणि रसिका वेंगुर्लेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट कॉमेडी, भावनिक क्षण आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारा आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडेल, अशी आशा आहे.