पुणे: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे होणाऱ्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित शतक महोत्सवी नाट्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये होत असलेल्या या संमेलनाला मराठी नाट्यसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष उपक्रम म्हणून नाट्यकलेचा जागर आयोजित करण्यात आला आहे.
विविध लोककलांनी सजली नाट्यदिंडी
शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त नाट्य कलेचा जागर होत आहे. यात खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा (महोत्सव), बालनाट्य स्पर्धा (महोत्सव), नाट्यसंगीत स्पर्धा (महोत्सव), एकपात्री स्पर्धा (महोत्सव), नाट्यछटा स्पर्धा (महोत्सव) आयोजित करण्यात आल्या आहेत. नाट्य कलावंतांसोबत पारंपरीक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोक कलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी पिंपरी चिंचवड करांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. यावेळी नागरिकांना कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. तसेच अनेकांनी हे सर्व क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.
advertisement
पुण्यातील शेतकऱ्याची किमया, पाहा कसा पिकवला निळा तांदूळ? Video
या कलाकारांनी व्यक्त केल्या भावना
यावेळी मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, गौरव मोरे, वर्षा उसगावकर, स्पृहा जोशी, भरतं जाधव यांनी न्यूज 18 मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. 3 वर्षानंतर हे नाट्यसंमेलन होतं आहे याचा आनंद होत असून आमच्यासाह ग्रामीण भागातील कलाकारांना देखील आपली कला सादर करण्याची संधी मिळत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
भावांनी दिलं चॅलेंज; रब्बाना बनल्या आर्वी आगारातील पहिल्या महिला बस ड्राइव्हर, पाहा यशाची कहाणी
असं असेल नाट्य संमेलन
नाट्य संमेलनातील सर्व स्पर्धांची प्राथमिक फेरी महाराष्ट्रातील विविध 22 केंद्रांवर जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. निवडक एकांकिका, बालनाट्य, नाट्यसंगीत, एकपात्री, नाट्यछटा उपांत्य फेरी नाशिक आणि सांगली येथे मार्च महिन्यात होईल. उपांत्य फेरीतून निवडण्यात आलेल्या नऊ एकांकिका आणि बालनाट्य तसेच नाट्यसंगीत, एकपात्री, नाट्यछटा यांची अंतिम फेरी एप्रिल 2024 मध्ये यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे होणार आहे. या संमेलनाचा प्रारंभ 5 जानेवारी 2024 रोजी पुण्यात झाला असून समारोप मे 2024 मध्ये रत्नागिरी येथे होणार आहे.