राज ठाकरे यांनी नुकताच दशावतार सिनेमा पाहिला. सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी व्हिडीओ शेअर करत सिनेमाचं कौतुक केलंय. राज ठाकरे यांनी म्हटलं, "या सिनेमातून एका गंभीर प्रश्नाला हात घालण्यात आला आहे. अनेक वर्षे मी माझ्या भाषणांमधून ही गोष्ट महाराष्ट्राला सतत सांगत आलो आहे की, आपल्या जमिनी वाचवा. कारण जमीनच तुमचं अस्तित्व आहे."
advertisement
दिग्दर्शक सुबोध खानोलकरचं कौतुक
राज ठाकरे म्हणाले, "खरंतर हा संपूर्ण महाराष्ट्रातला प्रश्न आहे. फक्त एकट्या कोकणातच ही गोष्ट आहे अशातला भाग नाही. महाराष्ट्रातल्या अनेक जमिनींचा विषय सुबोध खानोलकरने अत्यंत चालाखीने हा विषय सिनेमाच्या माध्यमातून मांडला आहे. दशावतारच्या सर्व रुपातून त्याते ती कथा आणली आहे. मी काय सिनेमाची कथा सांगत नाहीय. पण एक उत्कृष्ट छायाचित्रण, संगीत आणि दिग्दर्शक सुबोध असला तरी संपूर्ण महाराष्ट्राने यातून बोध घ्यावा असा हा सिनेमा आहे."
सिनेमातील कलाकारांचं राज ठाकरेंकडून कौतुक
राज ठाकरे यांनी सिनेमातील कलाकारांचं कौतुक केलं. ते म्हणाले, "दिलीप प्रभावळकरांनी उत्तम काम केलं आहे हे अत्यंत थोटं वाक्य आहे. कारण ते खूप मोठे आहेत. कमाल केलीये त्यांनी. महेश मांजरेकरने उत्तम काम केलं आहे. साजेसं काम केलं आहे. प्रियदर्शिनी त्यांनीही सुंदर, चांगलं काम केलं आहे."
राज ठाकरेंकडून सिनेमा पाहण्याचं आवाहन
राज ठाकरे म्हणाले, "या सिनेमात एंटरटेनमेंट आहेच पण म्हणून हा सिनेमा न पाहता त्यात महाराष्ट्रातल्या अत्यंत गंभीर विषयाला या सिनेमाने हात घातला आहे. त्यासाठी हा सिनेमा महाराष्ट्राने नक्की पाहिला पाहिजे."