'मामला लीगल है' काय आहे?
'मामला लीगल है' या सीरिजमध्ये दिल्लीच्या पटपड़गंज भागातील जिल्हा न्यायालयाची गोष्ट दाखविण्यात आली आहे. ज्यात अनेक असे विचित्र आणि मनोरंजक खटले येतात की ती ऐकल्यानंतर तुम्हीही तुमचे हसू थांबवू शकणार नाहीत. वकील वीडी त्यागीची भूमिका रवि किशन साकारत आहेत, जो कायदेशीर व्यवस्थेत आपल्या कौशल्याने आणि हुशारीने अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. सीरीजमध्ये दाखवलं आहे की एका खटल्यात तोत्याने महिलेला शिव्या घातल्याचा दावा आहे. त्या दरम्यान वकिलांमध्ये होणारं संभाषणही खूप गुंतागुंतीचं आणि पटत नाही असं आहे.
advertisement
Ankita Lokhande : 40 व्या वर्षी आई होणार अंकिता लोखंडे? चुकून सांगून टाकली गुडन्यूज, म्हणाली, 'आमचं होणारं बाळ...'
वीडी त्यागी बार असोसिएशनचे अध्यक्ष होण्याची इच्छा बाळगतात. सीरीजमध्ये अनन्या श्रॉफही आहे. अनन्याने नैला ग्रेवालची भूमिका साकारली आहे. नैला हार्वर्डमधून शिक्षण घेऊन आलेली एक तरुण वकील आहे. ती कायदेशीर मदतीपासून वंचित लोकांना मदत करू इच्छिते, पण कोर्टमध्ये पाहिलेल्या व्यवस्थेने तिला मोठा धक्का बसतो.
'मामला लीगल है' या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा राहुल पांडेने सांभाळली आहे. 1 मार्च 2024 रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. रिलीज झाल्यापासून आजही या सीरिजला प्रेक्षकांची तेवढीच प्रशंसा मिळत आहे. 517 दिवसांपासून या सीरिजचा ओटीटीवर कब्जा आहे. आयएमडीबीने या सीरिजला 8.0 रेटिंग दिले आहेत.