Ankita Lokhande : 40 व्या वर्षी आई होणार अंकिता लोखंडे? चुकून सांगून टाकली गुडन्यूज, म्हणाली, 'आमचं होणारं बाळ...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ankita Lokhande pregnancy : गेल्या काही दिवसांपासून अंकिता लवकरच आई होणार असल्याची दबकी चर्चा सुरू होती. आता या अफवांना पुष्टी देणारी एक मोठी गोष्ट स्वतः अंकितानेच केली आहे!
मुंबई : टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन नेहमीच त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात. पण, गेल्या काही दिवसांपासून अंकिता लवकरच आई होणार असल्याची दबकी चर्चा सुरू होती. आता या अफवांना पुष्टी देणारी एक मोठी गोष्ट स्वतः अंकितानेच केली आहे! तिने आपल्या एका खास मित्रासाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये ‘आमचं होणारं बाळ’ असा थेट उल्लेख केला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
अंकिताने पोस्टमधून दिली मोठी हिंट!
अंकिता लोखंडे ही निर्माता संदीप सिंहची खूप चांगली मैत्रीण आहे. नुकताच संदीपचा वाढदिवस होता. यानिमित्ताने अंकिताने इन्स्टाग्रामवर विकी आणि संदीपसोबतचे काही फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. या पोस्टमध्ये तिने जे लिहिलं, त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
अंकिताने लिहिलं, “तू खूप चांगला माणूस आहेस. ज्या पद्धतीने तू काल आलास, इतकी काळजी दाखवलीस... माझ्याबद्दल, विकीबद्दल आणि आमच्या होणाऱ्या बाळाबद्दलही इतकं काही बोललास... त्याने मला खूप आनंद आणि भावूक केलं!” हे कॅप्शन पाहताच चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे!
advertisement
advertisement
प्रेग्नन्सीच्या बातम्यांना आला जोर!
अंकिताने नकळतपणे केलेल्या या खुलाशानंतर आता तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा अधिकच वाढली आहे. एका युजरने थेट विचारलं, “होणारं बाळ!! थांबा... काय? तू प्रेग्नंट आहेस?” तर दुसऱ्याने, “तुम्ही प्रेग्नंट आहात का? अभिनंदन!” अशा कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
यापूर्वी अंकिता ‘लाफ्टर शेफ्स २’ च्या शूटिंगदरम्यान अभिनेता कृष्णा अभिषेकला मस्करीत म्हणाली होती, “मी प्रेग्नंट आहे.” त्यानंतर अंकिता आणि विकीनेही एका व्लॉगमध्ये या अफवांवर चर्चा केली होती. विकी म्हणाला होता की, “संपूर्ण कुटुंब याच विषयावर बोलत आहे आणि लवकरच चांगली बातमी मिळेल.” आता अंकिताच्या या नव्या पोस्टमुळे चाहत्यांना विश्वास वाटू लागला आहे की, ही गोड बातमी खरंच लवकरच अधिकृतपणे जाहीर होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Ankita Lokhande : 40 व्या वर्षी आई होणार अंकिता लोखंडे? चुकून सांगून टाकली गुडन्यूज, म्हणाली, 'आमचं होणारं बाळ...'