मृणालचा जुना व्हिडीओ समोर आल्यानंतर बिपाशानेही शांत बसण्याचा पर्याय निवडला नाही. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट टाकत अप्रत्यक्षपणे मृणालला उत्तर दिले. बिपाशाने लिहिले, "मजबूत महिला एकमेकींना उंचावतात. सुंदर महिलांनो, मसल्स तयार करा. मजबूत राहणं गरजेचं आहे. मसल्स तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. महिलांनी मजबूत दिसू नये हा जुनाट विचार सोडून द्या. स्वतःवर प्रेम करा."
advertisement
18 व्या वर्षी लग्न, कुटुंबाच्या विरोधात जाऊन थाटला संसार; पण वर्षभरातच मोडला
या विधानामुळे मृणालवर जोरदार ट्रोलिंग सुरू झाले आहे. अनेकांनी तिला महिलांविषयी चुकीची मानसिकता ठेवण्याचा आरोप केला. काहींनी तिच्या स्वतःच्या फिटनेसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
bipasha basu
बिपाशाविषयी मृणाल ठाकूर काय म्हणाली होती?
हा व्हिडिओ तिच्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेतील दिवसांमधील आहे.मुलाखतीत, मृणालच्या सहकलाकाराने (अरिजीत तनेजा) त्याला कोणत्या प्रकारची मुलगी लग्नासाठी हवी आहे, याबद्दल बोलताना बिपाशा बसूचे नाव घेतले. त्यावर मृणालने त्याला काही प्रश्न विचारले आणि म्हटले, "जा बिपाशाशी लग्न कर. तुला अशा मुलीशी लग्न करायचे आहे का जिचे पुरुषांसारखे मसल्स आहेत? ऐक, मी बिपाशापेक्षा खूप चांगली आहे."
दरम्यान, आता, बिपाशासोबतच्या या वादामुळे मृणाल पुन्हा एकदा चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे, आणि नेटिझन्स तिच्या जुन्या वक्तव्यावरून तिला चांगलंच धारेवर धरत आहेत.