व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आहे. तिला पाहायला मुलाकडची मंडळी आलेली असतात. अभिनेत्री शुभांगी गोखले सासूच्या भूमिकेत आहे. आमची मुलगी ट्रेकर आहे असं मृण्मयीचे वडील सांगतात. त्यावर शुभांगी गोखले तिला विचारतात, ए म्हणजे नेमकं काय गं तुम्ही? यावर मृण्मयी म्हणते, काय नाय चढायचं! मृण्मयीचं हे उत्तर ऐकून तिच्या आई-वडिलांसह मुलाकडेची मंडळीही शॉक होतात.
advertisement
त्यानंतर मृण्मयीच्या वडिलांच्या भूमिकेत असलेले मंगेश कदम सांगतात, ट्रॅव्हल ब्लॉगलर ( व्लॉगरल) आहे ती. त्यांचं हे बोलणं ऐकून पुन्हा एकदा एकच हशा पिकतो. सिनेमाच्या ट्रेलरमधील हा सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. ट्रेलरच्या 44व्या मिनिटाला असलेला हा सीन सगळ्यांना पोट धरून हसवतोय.
मनाटे श्लोक या आगामी मराठी सिनेमातील हा सीन आहे. सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांआधीच रिलीज झाला आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. या चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा सिनेमा 10 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.