TRENDING:

कंगवा फिरवला की केस यायचे हातात, स्टेज-4 च्या कॅन्सरशी झुंज; अभिनेत्रीला ओळखणंही कठीण

Last Updated:

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री स्टेज-4 कॅन्सरशी झुंज देत आहे. अभिनेत्रीने नुकतचं फोटो शेअर करत आपल्या गंभीर आजाराबद्दल भाष्य केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Nafisa Ali on Cancer : अभिनेत्री, सामाजिक कार्यकर्ता आणि माजी मिस इंडिया नफीसा अली सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री स्टेज-4 कॅन्सरशी झुंज देत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या नफीसाने आपल्या चाहत्यांना आपल्या आयुष्याबद्दल आणि गंभीर आजाराबद्दल अपडेट दिली आहे. अभिनेत्रीची भावूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. उपचारादरम्यानचा एक नवा फोटो अभिनेत्रीने नुकताच शेअर केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीचे गळालेले केस पाहायला मिळत आहेत. पण चेहऱ्यावर आत्मविश्वात आणि हसू मात्र स्पष्ट दिसत आहे. याआधीही अभिनेत्रीने केमोथेरपी दरम्यानचे फोटो शेअर केले होते. नुकतचं मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरमुळे निधन झालं. अनेक वर्षांची अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. प्रियाच्या निधनाने मराठी-हिंदी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. अशातच आता नफीसा कॅन्सरमुळे चर्चेत आल्या आहेत.

advertisement

नफीसा आजही सकारात्मकच

नफीसा यांनी फोटो शेअर करत लिहिलं आहे,"सकारात्मक शक्ति. माझी सगळ्यात जवळची मैत्रीण गॅबीसोबत". नफीसाचा हा फोटो पाहिल्यानंतर तिच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि तिचा कॅन्सरचा लढा यशस्वा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. नफीसाच्या या नव्या पोस्टने सोशल मीडियावरील तिचे चाहतेही भावूक झाले आहेत. सेलिब्रिटींसह चाहते कमेंट्स करत अभिनेत्रीला धीर देत आहेत. खूप गोड दिसत आहेस, काळजी घ्या, तब्येत सांभाळा, तुम्ही लवकर यातून बाहेर याल, अशा कमेंट्स चाहते करत आहेत.

advertisement

डिवोर्समुळे डिप्रेशन, गंभीर आजाराशी सामना करत होती BB फेम अभिनेत्री, 9 वर्षांनी दिली मोठी अपडेट

नफीसाने नुकतचं आपल्या मुलांसोबतची एक गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. अभिनेत्रीने लिहिलं होतं,"एक दिवशी मला माझ्या मुलांनी विचारलं,"तुझ्या निधनानंतर आम्ही कोणाकडे पाहायचं?". त्यावेळी मी त्यांना उत्तर दिलेलं,"एकमेकांकडे पाहा. हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी भेट असेल. भावा-बहिणीचं एकमेकांवर प्रेम आहे हाच माझा आनंद आहे. एकमेकांची काळजी घ्या. तुमचं बंधन आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही कठीण गोष्टीपेक्षा घट्ट आहे हे कायम लक्षात ठेवा".

advertisement

2018 पासून कॅन्सरचा लढा सुरू

नफीसाला नोव्हेंबर 2018 मध्ये पॅरिटोनियल कँसर या दुर्मिळ आजाराबद्दल कळलं होतं. आता उपचारांनंतर पुन्हा एकदा तिला केमोथेरपी घ्यावी लागत आहे. स्टेज 4 कॅन्सरबद्दल अभिनेत्रीने जास्त माहिती शेअर केलेली नाही. केमोथेरपीमुळे तिच्या त्वचेवर पांढरे डाग येत आहेत. कॅन्सरचा सामना करतानाही अभिनेत्री सकारात्मक आहे हे महत्त्वाचं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/मनोरंजन/
कंगवा फिरवला की केस यायचे हातात, स्टेज-4 च्या कॅन्सरशी झुंज; अभिनेत्रीला ओळखणंही कठीण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल