क्रिती सेनन अनेक मोठ्या चित्रपटांसाठी चर्चेत असताना, अचानक आनंद एल राय निर्मित एका महत्त्वाकांक्षी चित्रपटातून तिचे नाव वगळल्याची बातमी समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, 'नई नवेली' नावाच्या या चित्रपटासाठी क्रितीचे नाव जवळपास निश्चित झाले होते, पण आता तिच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीने ती जागा घेतली आहे.
कोण घेणार क्रिती सेननची जागा?
advertisement
क्रिती सेननची जागा घेणारी अभिनेत्री दुसरी कोणी नसून, यामी गौतम आहे! यामीने 'आर्टिकल ३७०' चित्रपटात दिलेल्या तिच्या दमदार अभिनयाने सगळ्यांना प्रभावित केले आहे. यामी आता एका नवीन हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे, जो भारतीय लोककथांवर आधारित असेल.
यामी गौतमच्या एंट्रीमुळे तिच्या चाहत्यांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण आहे. क्रिती सेनन आणि आनंद एल राय यांचा 'तेरे इश्क में' नंतरचा हा दुसरा एकत्र काम करण्याचा अनुभव ठरला असता, पण आता त्याला विराम मिळाला आहे.
क्रिती सेननला चित्रपटातून बाहेर काढण्यामागचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शन कामाला जानेवारी २०२६ पासून सुरुवात होणार आहे, तर त्यानंतर लगेच चित्रीकरणही सुरू होईल. मात्र, या चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार, हे नाव मात्र अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.