TRENDING:

लोकांसाठी नॅशशल क्रश, पण खऱ्या आयुष्यात कशी असते गिरीजा ओक? पाहा VIDEO

Last Updated:

Girija Oak : नॅशनल क्रश गिरीजा ओकचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

Girija Oak : मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक अनेक मालिका, चित्रपट आणि प्रामुख्याने जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. पण काही दिवसांपासून गिरीजा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. गिरीजाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आपल्या महाविद्यालयीन आयुष्यातील एक किस्सा शेअर केला. हा किस्सा शेअर करतानाचे तिचे हावभाव, तिचं दिसणं, तिचा साधेपणा, सोज्वळ लुक नेटकऱ्यांना भावला. नेटकऱ्यांनी गिरीजाला भारताची नवी क्रश, नॅशनल क्रश म्हणून घोषित केलं. आता या रातोरात नॅशनल क्रश झालेल्या गिरीजा ओकचा एक व्हिडीओ सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे.

advertisement

गिरीजा ओक व्हिडीओ व्हायरल (Girija Oak Video)

गिरीजा ओकने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ आणि फोटोंद्वारे गिरीजाने पुन्हा एकदा चाहत्यांना थक्क केलं आहे. गिरीजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती स्वत: एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे बाजारात भाजी विकत घेताना दिसत आहे. निवडून निवडून गवार विकत घेताना गिरीजा बार्गेनिंगदेखील करत आहे. तसेच अनेकांना वाटतं की कलाकार दररोज फॅन्सी जेवतात. आता नॅशनल क्रश काय जेवण करते? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. गिरीजाचा हा साधेपणा नेटकऱ्यांना पुन्हा एकदा भावला आहे.

advertisement

गिरीजाने आपल्या जेवनाच्या ताटाचा फोटोदेखील शेअर केला आहे. वरणभात, चटणी, अळूवडी या पदार्थांचा समावेश गिरीजा आपल्या आहारात करते. जेवण झाल्यानंतर गिरीजाने स्वत:चा फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोंमध्ये गिरीजा खूपच खूपच तृप्त दिसत आहे. हे फोटो व्हिडीओ शेअर करत गिरीजाने कॅप्शन लिहिलं आहे,"घर का खाना".

advertisement

नेटकऱ्यांकडून होतंय गिरीजाचं कौतुक

गिरीजाच्या लेटेस्ट पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. बटाटे किती रुपयांना दिले? नॅशनल क्रश, नॅशनल क्रशची भाजी खरेदी, घरगुती जेवण, नॅशनल क्रशचं हेल्दी जेवण, ड्रीम गर्ल, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी गिरीजाच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. एकंदरीत गिरीजा ओकची प्रत्येक गोष्ट सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अबब! चक्क 300अंडी देणारी कोंबडी, कमी खर्चात देतेय बक्कळ कमाई, शेतकऱ्यांची आवडती
सर्व पहा

मराठी बातम्या/मनोरंजन/
लोकांसाठी नॅशशल क्रश, पण खऱ्या आयुष्यात कशी असते गिरीजा ओक? पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल