ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडीची वैशिष्ट्ये: तरुण उद्योजक हैदर अली समाधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ब्लॅक ऑस्ट्रेलियन" ही ऑस्ट्रेलियन वंशाची सुधारित गावठी कोंबडी आहे. कडकनाथ कोंबडीप्रमाणे काळा रंग असला, तरी डोक्यावरचा तुरा आणि रक्त मात्र लाल रंगाचा असते. या कोंबडिची परसबाग आणि बंदिस्त पोल्ट्री फार्म दोन्ही प्रकारे उत्तम वाढ होते.
परसबागेत पालन केल्यास अडीच महिन्यात सव्वा किलो किंवा त्यापेक्षाही जास्त वजन होते. कोंबडी पाच ते सहा महिन्याची झाला की अंडी देणे सुरू करते. पुढे वर्षभरात 300 अंडी देतो. साधारणपणे वर्षभर अंडी दिल्यानंतर कोंबडी मांसासाठी वापरता येते. तिच्या मांसाची चव रुचकर असल्याने चिकनप्रेमी पसंती देतात.
advertisement
पारंपरिक गावठी कोंबडी वर्षाला केवळ 50 ते 70 अंडी देते. तसेच तिचे एक किलो वजन होण्यास सुमारे सात ते आठ महिने लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांचा खर्चही वाढतो. त्या तुलनेत 'ब्लॅक ऑस्ट्रेलियन' कोंबडी वर्षभरात 250 ते 300 अंडी देते. तसेच अडीच ते तीन महिन्यातच सव्वा किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजनाची होते. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पन्न वाढविण्याचा पर्याय म्हणून शेतकरी या कोंबडीला पसंती देत असल्याचे अनुभवी व्यावसायिक सांगतात.





