advertisement

परळीचा लाचखोर तहसीलदार मुंडे सस्पेंड, प्रशासनाकडून 23 दिवसानंतर मोठी कारवाई

Last Updated:

परळीसारख्या महत्त्वाच्या तालुक्याचे तहसीलदार लाच घेताना आढळल्याने प्रशासनाच्या प्रतिमेला तडा गेला होता.

News18
News18
बीड : भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेले परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंडे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी या निलंबनाच्या आदेशावर स्वाक्षरी केली असून, यामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
व्यंकटेश मुंडे यांनी एका कामासाठी लागणारे 'सॉल्वन्सी प्रमाणपत्र' (Solvency Certificate) देण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केल्यानंतर मुंडे यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारे कारवाई झाल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली होती.
advertisement

शासकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई 

गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यंकटेश मुंडे यांना अंबाजोगाई येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मुंडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या त्यांची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. नियमानुसार, फौजदारी गुन्ह्यात 48 तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाते, त्यानुसार विभागीय आयुक्तांनी हे आदेश काढले आहेत.
advertisement

मुंडे यांच्या संपत्तीचीही चौकशी होण्याची शक्यता 

परळीसारख्या महत्त्वाच्या तालुक्याचे तहसीलदार लाच घेताना आढळल्याने प्रशासनाच्या प्रतिमेला तडा गेला होता. या निलंबनाच्या कारवाईमुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडक संदेश देण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, मुंडे यांच्या संपत्तीचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
advertisement

नेमकं काय घडलं होतं? 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर पडताळणीवेळी व्यंकटेश मुंडे यांनी चिठ्ठीवर लाचेचे 50, नंतर 25 असे आकडे लिहून लाच मागितल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तक्रारदाराने वीस हजार देतो म्हणल्यानंतर अजून तीन टाका असे म्हणत 23 हजारांची मागणी केली. यानंतर तीन वेळा लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता. मात्र संशय आल्याने मुंडे यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने काल त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान आता या कारवाईनंतर तहसील परिसरात उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी फटाके फोडत आतिषबाजी केली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
परळीचा लाचखोर तहसीलदार मुंडे सस्पेंड, प्रशासनाकडून 23 दिवसानंतर मोठी कारवाई
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement