मराठी ज्येष्ठ अभिनेत्रीनं मालिका सोडताच व्हिडीओ शेअर करत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. दोन वर्ष अविरतपणे शूटींग केलं. दमछाक झाली मात्र तरीही आनंदानं आणि संपूर्ण टीमच्या मदतीने मालिका केल्याचं अभिनेत्रीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.
( ईशा डेच्या लग्नात भाव खाऊन गेले समीर चौघुले! त्या कृतीने वेधलं लक्ष; नेमकं काय करत होते? पाहा PHOTO )
advertisement
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे नीना कुळकर्णी. स्टार प्रवाहवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत त्यांनी जीजी ही भूमिका साकारली होती. पण लेटेस्ट एपिसोडमध्ये मालिकेत जीजीचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं. त्यामुळे नीना कुळकर्णी यांचा मालिकेतील प्रवास देखील संपला आहे.
नीना कुळकर्णी यांचा मालिकेतील शेवटचा सीन शूट केल्यानंतर सेटवर सेलीब्रेशन करत त्यांना आनंदानं निरोप देण्यात आलं. सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करत नीना कुळकर्णी यांनी लिहिलंय, "जीजी गेली … मनाला चटका लावून.. येड लागले प्रेमाचे ह्या स्टार प्रवाह वरच्या मालिके मधले माझे काम संपले. गेली 2 वर्ष मालिकेचे अविरत चित्रीकरण केले. जीजी चा दरारा मोठा त्यामुळे तिचे सीन्स ही तसेच..मोठे आणि जिवंत. दमछाक व्हायची, पण सर्वांनी सांभाळून घेतले अगदी सहकलाकारांपासून ते क्रिएटिव्हस,दिग्दर्शन, प्रोडक्शन, कैमरा टीम्स…मेकअप ची मंडळी , हेयर ड्रेसर, कपडेपट …. स्पॉट बॉईज आणि त्यांचे सुग्रास पदार्थ ! सगळेच मनमिळाऊ आणि हसतमुख."
"ह्या सेट वर ना कधी वाद झाले ना कधी मतभेद. आम्ही सगळे सामोपचाराने काम करायचो. असा अनुभव विरळाच. येड लगले प्रेमचेच्या पुढच्या प्रवासा करता माझ्या शुभेच्छा.
कितीतरी सुरेख आठवणींचा ठेवा बरोबर घेऊन निघाले आहे," असं म्हणत नीना कुळकर्णी यांनी मालिकेला शुभेच्छा दिल्या.
येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या निमित्तानं नीना कुळकर्णी यांना टेलिव्हिजनवर पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच होती. नीना कुळकर्णी यांचं 'असेन मी नसेन मी' हे मराठी नाटक सध्या रंगभूमीवर सुरू आहे. तसंच 'गौहर' या हिंदी नाटकातंही त्या काम करत आहेत. अभिनेत्री गिरिजा ओक यात त्यांच्याबरोबर महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
