घटस्फोटाच्या अफवांवर ऐश्वर्याने सोडलं मौन
"माझ्याबद्दल ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी लोकांनी सत्य जाणून घ्यावे," असे तिने स्पष्ट केले. ऐश्वर्याने सांगितले की, "माझी जेव्हापासून एंगेजमेंट झाली आहे, तेव्हापासून मला सातत्याने ट्रोल केले जात आहे आणि मी ते नेहमी हसून-हसून सहन केले आहे." तिने स्पष्ट केले की, तिने कधीही कोणाला त्रास दिला नाही किंवा वाईट वागणूक दिली नाही, उलट ती स्वतःच 'बुली'चा बळी ठरली आहे, जे सामान्य लोकांच्या नजरेत येत नाही.
advertisement
टीव्ही मालिकेच्या सेटवर सुरू झालं प्रेम
ऐश्वर्या आणि नील भट्ट यांची पहिली भेट 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या सेटवर झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी एका वर्षाच्या आत लग्न केले. लग्नानंतर हे दोघे 'बिग बॉस १७' मध्येही दिसले. शोमध्ये त्यांच्यातील केमिस्ट्रीचे खूप कौतुक झाले, पण याचदरम्यान ऐश्वर्याला नीलवर अनेकदा रागवतानाही पाहिले गेले होते. प्रत्येक वेळी नीलने मात्र खूप शांतपणे तिचा राग शांत केला होता.
गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे सोशल मीडियावर एकत्र फोटो टाकत नसल्याने, त्यांच्या नात्यात अंतर वाढले असल्याची चर्चा होती. अशातच, आता ऐश्वर्याने आता या पोस्टद्वारे लोकांना चुकीच्या गोष्टी न पसरवण्याचे आवाहन केले आहे.
