निक्की शर्माने फोडले गुपित
रणवीरने दिवाळीच्या दिवशी जूही भट्टसोबतचे रिलेशनशिप अप्रत्यक्षपणे कन्फर्म केल्यानंतर, निक्की शर्माने लगेच आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका मित्रासोबत झालेल्या खासगी चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला. या चॅटमध्ये निक्कीने कोणाचेही नाव न घेता आपल्या माजी प्रियकरावर निशाणा साधला आहे.
निक्कीने लिहिले आहे की, "तो (रणवीर) काही महिने खूप छान वागेल, पण नंतर ट्रॉमामुळे मी कधीच लग्न करू शकत नाही किंवा बाळ जन्माला घालू शकत नाही, असं म्हणेल."
advertisement
'सूनबाई अडकल्या म्हणून आता मोदीभक्तीने पछाडलं', महेश कोठारेंच्या वक्तव्यावर ठाकरे सेनेचा हल्लाबोल
चॅटमध्ये पुढे लिहिले होते, "मी आतून हादरले होते, पण नेहमी वरून ठीक असल्याचा देखावा करत राहिले. तो काही महिने चांगला राहील आणि मग म्हणेल, 'ओह हो, मला ट्रॉमा आहे, मी कधीच लग्न करू शकणार नाही किंवा बाळं जन्माला घालू शकणार नाही.'" निक्कीचे हे चॅट थेट रणवीरसोबतच्या नात्यावर शंका उपस्थित करत आहे.
दिवाळीच्या फोटोंनी जुही-रणवीरच्या नात्यावर शिक्कामोर्तब
रणवीरने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना, 'यावर्षी मोठ्या माणसासारखी दिवाळी साजरी करतोय' आणि 'दैवी कृपेबद्दल धन्यवाद' असे कॅप्शन दिले होते. यानंतर जुही भट्टनेही त्याच फुलांच्या रांगोळीचा फोटो शेअर केला, ज्यामुळे ते दोघे एकत्र होते हे स्पष्ट झाले.
रणवीरचे यापूर्वी निक्की शर्मासोबत रिलेशनशिप होते. तो तिच्या चेहऱ्यावर 'सूर्यफूल' इमोजी लावून फोटो शेअर करायचा. त्याने निक्कीला अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला रणवीर एका पॉडकास्ट शोमध्ये पालकांशी संबंधित आक्षेपार्ह प्रश्न विचारल्यामुळे वादात सापडला होता. या प्रकरणी त्याच्यावर एफआयआर देखील दाखल झाली होती, ज्यानंतर त्याने जाहीर माफी मागितली होती.