TRENDING:

मैत्रीत पडली ठिणगी! बिग बॉसच्या घरात ओमकार-आयुष आमनेसामने; चौथ्या आठवड्याच्या सुरूवातीलाच हाय-व्होल्टेज ड्रामा

Last Updated:

Bigg Boss Marathi 6: ज्या मैत्रीची उदाहरणं दिली जात होती, त्याच मैत्रीत आता उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. ओमकार राऊत आणि आयुष हे जिवलग मित्र आता एकमेकांचे कट्टर वैरी बनले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' चं घर म्हणजे एक असं चक्रव्यूह आहे, जिथे नाती आणि जिवाभावाच्या मैत्रीची कसोटी लागते. गेल्या 'भाऊच्या धक्क्या'मध्ये घराचा ग्लॅमरस तडका म्हणजेच सोनाली राऊत हिची एक्झिट झाली आणि हा धक्का पचवण्यापूर्वीच चौथ्या आठवड्याच्या सुरुवातीला नॉमिनेशनचा हाय-व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या मैत्रीची उदाहरणं दिली जात होती, त्याच मैत्रीत आता उभी फूट पडल्याचं पाहायला मिळतंय. ओमकार राऊत आणि आयुष हे जिवलग मित्र आता एकमेकांचे कट्टर वैरी बनले आहेत.
News18
News18
advertisement

मैत्रीवर चालवली कुऱ्हाड

नव्या भागात नॉमिनेशनचा टास्क पार पडला. या टास्कमध्ये सदस्यांना आपल्या न आवडणाऱ्या किंवा स्पर्धेतून बाहेर काढाव्याशा वाटणाऱ्या सदस्याच्या फोटोवर कुऱ्हाड मारायची आहे. जेव्हा ओमकारची वेळ आली, तेव्हा त्याने थेट आयुषच्या फोटोवर कुऱ्हाड मारली. हे पाहून घरातील इतर सदस्यांच्या काळजाचा ठोका चुकला. ज्या आयुषला ओमकार आपला सर्वात जवळचा मित्र मानायचा, त्याच्यावरच त्याने वार केला आहे.

advertisement

हीच खरी लक्ष्मी! ज्ञानदामुळे हर्षदला मिळालं हक्काचं घर, एका हट्टाने फळफळलं नशीब; सांगितला 'तो' रंजक किस्सा

ओमकारने यावेळी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. तो म्हणाला, "माझं पहिलं नाव आयुष आहे. तो माझा इथला पहिला मित्र होता. पण त्याने माझं नाव नॉमिनेशनसाठी का घेतलं, हे मला कळलं नाही. त्याच्याकडे इतर अनेक पर्याय होते, पण त्याने मलाच लक्ष्य केलं. आता जर त्याला मैत्री टिकवायचीच नाहीये, तर काय करायचं?" आयुषने आधी ओमकारला नॉमिनेट केल्यामुळे त्याचा बदला म्हणून ओमकारने हे पाऊल उचललं आहे.

advertisement

आयुषने ओमकारला नॉमिनेट करताना त्याच्या कमी पडत असल्याचं कारण दिलं. आयुषच्या म्हणण्यानुसार, इतर स्पर्धकांच्या तुलनेत ओमकारचा गेम दिसत नाहीय.

रागाचा उद्रेक आणि ओमकारच्या अश्रूंचा बांध फुटला

ओमकार राऊत हा सहसा शांत आणि संयमी खेळाडू मानला जातो. पण या टास्कमध्ये त्याचा एक वेगळाच अवतार पाहायला मिळाला. जिवलग मित्राने दगा दिल्याची भावना त्याच्या मनात इतकी प्रबळ होती की, कुऱ्हाड मारताना त्याला रडू कोसळलं. संतापाच्या भरात त्याने हातातील कुऱ्हाड जमिनीवर जोरात फेकून दिली. रितेश देशमुखने 'भाऊच्या धक्क्या'वर ओमकारला त्याचा गेम दिसत नसल्याची तंबी दिली होती. कदाचित रितेशच्या त्या शब्दांनी ओमकार आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आला असून त्याने सर्वात आधी आपल्या मित्रालाच शिंगावर घेतलं आहे.

advertisement

चौथ्या आठवड्याची समीकरणं बदलणार

सोनाली राऊतच्या जाण्यानंतर आता घराचे दोन गट पडले आहेत. ओमकार आणि आयुषमधील हा वाद केवळ दोघांपुरता मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण घराची समीकरणं बदलणार आहेत. जिवलग मित्र आता एकमेकांचे गेम खराब करण्यासाठी कोणती नवी खेळी खेळतात, हे पाहणं रंजक ठरेल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान, चौथ्या आठवड्यात दिपाली सय्यद, सचिन कुमावत, राकेश बापट, ओमकार राऊत, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, आयुष संजीव आणि दिव्या शिंदे नॉमिनेट झाले आहेत. यापैकी कोणता स्पर्धक घराबाहेर पडतो हे या आठवड्याच्या 'भाऊच्या धक्क्या'मध्येच कळेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
मैत्रीत पडली ठिणगी! बिग बॉसच्या घरात ओमकार-आयुष आमनेसामने; चौथ्या आठवड्याच्या सुरूवातीलाच हाय-व्होल्टेज ड्रामा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल