नुकताच ओरी 'बिग बॉस OTT' विजेता एल्विश यादवच्या एका पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. तिथे गप्पा मारताना ओरीने एक अजब किस्सा सांगितला. तो म्हणाला, "एका माणसाला ८ वर्षांपासून मूल होत नव्हतं. त्याने मला विचारलं की, 'ओरी टच' काही जादू करू शकतो का? मी त्याला म्हटलं की, मी कोणतीही गॅरंटी देत नाही, पण तुला स्पर्श हवा असेल तर मी देऊ शकतो. त्या माणसाचा एक शारीरिक अवयव व्यवस्थित काम करत नव्हता. मी तिथे स्पर्श केला... आणि काय आश्चर्य! अवघ्या ३ महिन्यांत त्याची पत्नी गरोदर राहिली!"
advertisement
एल्विशने जेव्हा आश्चर्याने विचारलं की, "नेमकं कुठे स्पर्श केला?" तेव्हा ओरीने कसलाही संकोच न बाळगता उत्तर दिलं. तो म्हणाला, "त्याच्या त्या अवयवाला जो काम करत नव्हता. मी कपड्यांच्या वरूनच टच केला होता. मी असं म्हणत नाहीये की हे माझ्यामुळेच झालं, पण ८ वर्ष जे घडलं नाही ते माझ्या स्पर्शानंतर ३ महिन्यांत घडलं! तो माणूस इतका खूश झाला की त्याने स्वतः लोकांना सांगितलं की ओरीच्या टचमुळे हे शक्य झालं."
What did I just watch?!?! Oh my god!
एल्विशची रिॲक्शन होतेय व्हायरल
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर आला आहे. ओरीच्या या विधानापेक्षा लोकांचं लक्ष एल्विश यादवच्या चेहऱ्यावरील हावभावांकडे जास्त आहे. आयुष्यात पहिल्यांदाच एल्विश कोणासमोर तरी 'निःशब्द' झालेला पाहायला मिळाला.
एक युजर म्हणाला, "फर्टिलिटी क्लिनिक्स आता बंद होणार वाटतं!" दुसरा म्हणाला, "एल्विशचा चेहरा बघा, त्याला कळतच नाहीये की नेमकं काय बोलावं." काहींनी टोला लगावला "पब्लिसिटीसाठी ओरी आता काहीही बोलायला लागला आहे, यालाच म्हणतात 'फेकाफेकी'ची हद्द!"
कोण आहे ओरी?
ओरी हा ना अभिनेता आहे ना मॉडेल, तरीही तो बॉलीवूडमधील प्रत्येक मोठ्या स्टारचा जवळचा मित्र आहे. नीता अंबानींपासून ते जान्हवी कपूरपर्यंत सर्वांसोबत त्याचे फोटो असतात. त्याने अलीकडेच जाहीर केलं होतं की, तो चाहत्यांसोबत अशा पोझमध्ये फोटो काढण्यासाठी लाखो रुपये मानधन घेतो. पण आता हा 'बेबी टच'चा नवीन प्रकार समोर आल्यामुळे ओरी पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.
