हॉरर, थ्रिलर सीरिज पाहायची?
हॉरर, थ्रिलर सीरिजची आवड असणाऱ्यांसाठी 'अधूरा' हा एक उत्तम पर्याय आहे. या सीरिजची जबरदस्त कथा तुमचं भान हरपवून टाकेल. ही सीरिज पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या खोलीतूनही बाहेर पडायला भीती वाटेल. या भुताटकी सीरिजला पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी मनाची तयारी करावी लागेल. भावुक स्वभावाच्या असणाऱ्यांनी मात्र ही सीरिज आपल्या स्वतःच्या रिस्कवर पाहावी. या सीरिजमध्ये एकूण 7 एपिसोड्स आहेत आणि प्रत्येक एपिसोड धडकी भरवणारा आहे.
advertisement
Javed Akhtar-Shabana Azmi : प्रिटी लिटील बेबी....! शबानाची पच्चांहत्तरी, रोमँटिक झाले जावेद अख्तर! VIDEO
काय आहे 'अधूरा'?
'अधूरा' या सीरिजमध्ये एका हॉस्टेल आणि तिथे राहणाऱ्या छोट्या मुलांची कथा दाखवण्यात आली आहे. त्या हॉस्टेलमधल्या एका लहान मुलाला भूत दिसतं. वेळ जसा-जसा पुढे सरकतो तसं ते भूत अती करू लागतं. हॉस्टेलमध्ये एकामागून एक हत्या होऊ लागतात. या सगळ्या घटनांमुळे शाळेचं प्रशासन चिंता व्यक्त करतं. एकंदरीतच या सीरिजची थरारक गोष्ट लक्ष वेधून घेते. विशेषतः या सीरिजचा क्लायमॅक्स तुमचं मन हादरवून टाकेल.
'अधुरा' ही वेब सीरिज 2023 साली प्रदर्शित झाली होती आणि तुम्ही ती अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.
या सीरिजमध्ये ईशाक सिंह आणि रसिका दुग्गल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. IMDb वर या सीरिजवा 6.6 रेटिंग मिळाले आहे.