भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारामध्ये पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्कारांचा समावेश असतो. राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदा पद्म पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, अशोक सराफ यांच्याबरोबरच कलाविश्वातील अनेक मान्यवरांचा पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोहर जोशी आणि पंकज उदाश यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. गायक अरिजीत सिंग याला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
कलाक्षेत्रासाठी महाराष्ट्रातून अच्युत पालव, अशोक सराफ, आश्विनी भिडे - देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित एका भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाईल. १९५४ पासून प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर केले जातात.