परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्यात वयाचा फरक किती?
परिणीती चोप्राचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 रोजी झाला आहे. तर राघव चड्ढाचा जन्म 11 नोव्हेंबर 1988 रोजी झाला आहे. त्यामुळे परिणीती राघव चड्ढा यांच्यापेक्षा 20 दिवसांनी मोठी आहे. पण प्रेमाच्या बाबतीत वय फक्त एक आकडा आहे हे स्पष्ट होते.
परिणीती चोप्राचं नेटवर्थ आणि कमाई
advertisement
परिणीती चोप्राचं बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर आहे. डीएनएच्या माहितीनुसार, अभिनेत्रीचं नेटवर्थ सुमारे 74 कोटी रुपयांच्या आसपास आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया कोलॅबोरेशनमधून ती चांगली कमाई करते. मुंबईत 22 कोटींच्या किमतीच्या समुद्राराजवळील आलिशान अपार्टमेंट तिचे घर आहे, तसेच तिच्या जवळ जग्वार, ऑडी आणि रेंज रोव्हर सारख्या महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे.
राघव चड्ढा यांची नेटवर्थ आणि कमाई
राघव चड्ढा यांच्या घोषित संपत्तीबाबत बोलायचे झाले तर त्यांची एकूण संपत्ती तुलनेने कमी आहे. त्यांच्या निवडणूक हलफनाम्यानुसार, त्यांच्याकडे सुमारे 50 लाख रुपयांची संपत्ती आहे, ज्यात दिल्लीतील 36-37 लाख रुपयांचं घर, 5 लाख रुपयांच्या 90 ग्रॅम सोन्याचा तुकडा आणि शेअर्स व म्युच्युअल फंडमध्ये जवळपास 6 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. गाड्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर राघव मारुती सुझुकी स्विफ्ट डिजायर ही कार चालवतात.