TRENDING:

सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून..., Video

Last Updated:

Diwali Shopping: ऐन दिवाळीत सोनं महागलं असून टेराकोटा दागिने एक उत्तम पर्याय ठरत आहेत. तुम्ही देखील बहिण, पत्नीला भेट देण्यसाठी किंवा स्वत:साठी हटके ज्वेलरी घेऊ शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आजकाल ज्वेलरी डिझाईनमध्ये खूप वेगवेगळे पॅटर्न आले आहेत. सोन्या-चांदीच्या पलीकडे आता लोकांचा कल हँडमेड ज्वेलरीकडे वाढतोय. त्यात सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहे ते म्हणजे टेराकोटा ज्वेलरी. यंदा दिवाळीच्या काळात या दागिन्यांना चांगलीच मागणी आहे. अनेकजण आपल्या बहीण, पत्नी आणि मुलीला भेट देण्यासाठी खास टेराकोटा ज्वेलरी घेतात.
advertisement

मातीपासून बनवलेली टेराकोटा ज्वेलरी ही दिसायला सुंदर आणि स्टायलिश असते. टेराकोटा ज्वेलरीमध्ये वेगवेगळे पॅटर्न दिसतात. फुलांची डिझाईन, पानांची, ट्रायबल, वॉर्ली आर्ट किंवा ज्योमेट्रिक पॅटर्न अशा डिझाईन्स आजकाल खूप चालत आहेत.

या ज्वेलरीमध्ये नेकलेस सेट, झुमके, बांगड्या, अंगठ्या, पेंडंट सेट आणि इयरिंग्स असे सगळे प्रकार मिळतात. यामध्ये ब्राऊन, गोल्डन, निळा, ऑरेंज, मॅट कलर असे युनिक कलर वापरले जातात. त्यामुळे ही ज्वेलरी साडीवर, ड्रेसवर किंवा वेस्टर्न आउटफिटवरही छान दिसते. तसेच आपण दिवाळीत बहीण, मैत्रिण, मुलगी किंवा पत्नीला भेट देऊ शकता.

advertisement

Padwa Gift Ideas : यंदा बायकोला द्या खास भेट! 'हे' अनोखे गिफ्ट पाडवा बनवतील आनंदी आणि अविस्मरणीय

किंमतीबद्दल सांगायचं तर, बाहेर ही ज्वेलरी ₹300 ते ₹350 पर्यंत मिळते, पण मालाड पश्चिम रेल्वे स्टेशनजवळील क्रिस्टल प्लाझा या होलसेल मार्केटमध्ये फक्त ₹145 ते ₹160 मध्ये मिळते. मात्र इथे होलसेलमध्ये खरेदी करावी लागते, म्हणजे कमीत कमी ₹2000 ची खरेदी आवश्यक असते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून
सर्व पहा

सध्या या ठिकाणी वेगवेगळ्या दुकानदारांकडून टेराकोटा ज्वेलरीचे 200 पेक्षा जास्त प्रकार मिळतात आणि सगळ्यात खास म्हणजे ऑनलाइन व्हिडिओ कॉलवरूनही खरेदी करता येते. टेराकोटा ज्वेलरीच्या या ट्रेंडमुळे हाताने काम करणाऱ्या लोकांना नव्या संधी मिळत आहेत आणि भारतीय पारंपरिक कला पुन्हा फॅशनमध्ये आली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
सोनं महागलंय, दिवाळीत घ्या हटके अन् स्टायलिश ज्वेलरी, किंमत फक्त 145 रुपयांपासून..., Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल