तेर नामचा बनणार सिक्वेल ?
मीडिया रिपोर्टनुसार, 22 वर्षांनंतर साजिद नाडियावाला 'तेरे नाम' च्या प्रोजेक्टवर काम करण्याचा प्लॅन करत आहेत. तेरे नाम सिनेमाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. तेरे नाम सिक्वलची कल्पना ही 2020 साली आली होती. साजिद या सिनेमाचे राइट्स घेणार आहेत त्यासाठी बोलणी सुरू आहे. सिनेमाचे राइट्स हे अजूनही प्रमुख प्रोड्यूसर मनचंदा आणि मुकेश तलरेजा याच्याकडे आहे.
advertisement
लीड रोल सलमान करणार ?
'तेरे नाम 2' साठी सलमान खानला कास्ट करणार असल्याचे बोललं जात आहे. मिड डे सोबत बोलताना म्हणाले, "एकदा लीगल प्रोसेस झाले की, तो लॅाक केला जाईल. त्यानंत डायरेक्टर कोण ते सांगितले जातील. स्क्रिप्टवरती काम चालू आहे."
किती होती 'तेरे नाम' ची कमाई आणि बजेट
तेरे नाम 15 ऑगस्ट 2003 ला रिलीज झाला होता. 10 कोटी बजेट असलेल्या या सिनेमाने भारतात 22.53 करोड कमाई केली हेती. याची आईएमडीबी रेंटींग 7.02 एवढे होते. हा सिनेमा आपण झी 5 वरती पाहू शकतो.