ज्योती सिंहचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ज्योती सिंहने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ज्योतीच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणतेय, "पवन सिंहने माझ्याविरुद्ध FIR नोंदवली आहे आणि पोलिसांनी मला ताब्यात घेतलं आहे. आम्ही तुमच्या सांगण्यावरून येथे आलो होतो कारण तुम्ही म्हणाला होतात की ‘भाभी, तुम्ही जा, पाहू कोण तुम्हाला बाहेर काढतंय.’ मी त्याची पत्नी आहे आणि म्हणूनच येथे आली आहे".
advertisement
OTT Releases this Week : अॅक्शन, सस्पेंस अन् ड्रामा; ओटीटीवर 'या' आठवड्यात मनोरंजनाचा फुल डोस
व्हिडिओमध्ये ज्योती सिंह पोलिसांना विचारतेय,"मॅडम, तुम्ही कोणत्या प्रकरणासाठी आम्हाला घेऊन जात आहात?” यावेळी पोलीस उत्तर देतात,“कोणतंही प्रकरण नाही, चला आणि बोलूया.” नंतर ज्योती फोनवर कुणाशी तरी बोलताना दिसते, त्या वेळेस ती खूप भावनिक होते आणि रडत म्हणते की,“पोलिस आले आहेत आणि मला माहित नाही कोणत्या प्रकरणासाठी आम्हाला वारंवार पोलिस स्टेशनकडे नेलं जात आहे. आम्ही आमच्या पतीच्या घरी आलो होतो, त्यासाठी FIR नोंदवली जात आहे.”
ज्योती सिंहचे पवन सिंहवर गंभीर आरोप
ज्योती सिंह आणि पवन सिंह यांच्यात अनेक दिवसांपासून अलबेल आहे. घटस्फोटापर्यंत त्यांच्यातील वाद गेला आहे. काही दिवसांपूर्वी ज्योतीने पवन सिंहवर गंभीर आरोप केले होते. ज्योतीला फक्त आपल्या पतीसोबत बोलायचं होतं, पण जेव्हा ती त्याच्या घरी भेटायला गेली, तेव्हा पवन सिंहने तिला भेटण्याऐवजी पोलिसांना बोलावले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक पवन सिंहच्या या वागण्यावर प्रश्न उभे करत आहेत. तसेच काही नेटकरी ज्योतीच्या बाजूने उभे आहेत.
ज्योती सिंहच्या समर्थनार्थ नेटकरी
ज्योती सिंहच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने लिहिलंय,"पवन सिंह एवढ्या खालच्या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. ज्योती सिंहसोबत अत्यंत चुकीचं होत आहे.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिलंय, "कृपया ज्योतीला पाठिंबा द्या" आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं आहे,"विनाश काळे विपरीत बुद्धि नाश, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केलेल्या पाहायला मिळत आहेत. पवन सिंहने एका अभिनेत्रीच्या कमरेला चुकीचा स्पर्श केला होता.