TRENDING:

अभिनेत्याचे अश्लील चाळे, अभिनेत्रीच्या कंबरेत हात; संतापलेली बायको म्हणाली, 'जीव देण्याशिवाय पर्याय नाही'

Last Updated:

Pawan Singh Wife Reaction : भर कार्यक्रमात अभिनेत्रीच्या कंबरेत हात घालणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ संपूर्ण देशाने पाहिला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अभिनेत्याच्या संतापलेल्या बायकोची प्रतिक्रिया समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भर कार्यक्रमात अभिनेत्रीच्या कंबरेला हात लावून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका अभिनेत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  भोजपुरी अभिनेता पवन सिंहचा हा व्हिडीओ आहे.   सैया सेवा करे हे त्यानं नवीन गाणं नुकतीच रिलीज झालं. या गाण्याच्या निमित्तानं तो त्याची सहअभिनेत्री अंजली राघवसोबत दिसला. गाण्याच्या प्रमोशनवेळी त्याने अंजलीच्या कंबरेला हात लावला. हा विअर्ड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पवनसिंहची बायको मात्र चांगलीच संतापली आहे. पवन सिंहच्या बायकोची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्याच्यातील कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आलेत. माझ्याकडे आता जीव देण्याशिवाय पर्याय नाहीये असं म्हणत त्याच्या बायकोनं संपात व्यक्त केला आहे.
News18
News18
advertisement

पवन सिंहची बायको ज्योती सिंह हिनं एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिनं पवन सिंहच्या पापांचा पाढा वाचला आहे. तिनं पत्रात लिहिलंय,  "आदरणीय पती श्री. पवन सिंह मी अनेक महिन्यांपासून काही कौटुंबिक आणि राजकीय मुद्द्यांवर तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्ही किंवा तुमच्या जवळच्या लोकांनी माझे कॉल व मेसेजेसना उत्तर दिलं नाही."

advertisement

( आधी टकामका पाहिलं, मग थेट हातच घातला; भर कार्यक्रमात अभिनेत्याचा कंट्रोल सुटला, Weird Video )

तिने पुढे लिहिलंय,  त्या लखनौमध्ये पवन सिंह यांना भेटायला गेल्या. छठ सणाच्या वेळी देहरीला गेल्या पण प्रत्येक वेळी त्यांना निराशा झाली. एवढंच नाही तर ज्योतींच्या वडिलांनीही पवन सिंह यांना भेटण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही.

advertisement

माझ्या पालकांच्या इज्जतीशी खेळले जात आहे

ज्योतीने पत्रात लिहिलंय, "मी असं कोणतं मोठं पाप केलंय ज्यासाठी मला एवढी मोठी शिक्षा दिली जात आहे? माझ्या पालकांच्या इज्जतीशी खेळलं जात आहे. जर मी तुमच्या लायक नसते तर मला सुरुवातीलाच का नाही सोडलं? लोकसभा निवडणुकीत मला सोबत नेलं, तुम्ही मला अशा परिस्थितीत ढकललंय जिथून आता आत्महत्या करण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. पण आत्महत्येसारखं पाऊल उचललं तर माझ्यावर आणि माझ्या पालकांवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, त्यामुळे मी असं पाऊल उचलत नाही".

advertisement

ज्योती सिंह यांनी पवन सिंह यांना आवाहन करत लिहिलंय, "मी सात वर्षे संघर्ष केला. नेहमीच तुम्हाला साथ दिली. पत्नी म्हणून कर्तव्य पार पाडलं. आता मला आधार देण्याची तुमची पाळी आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांना माफ करता, त्यांना मिठी मारता, पण माझ्या वेदनांकडे दुर्लक्ष करता. एकदा माझ्याशी बोला. माझे कॉल आणि मेसेजेसना उत्तर द्या. किमान माझं दुःख समजून घ्या.”

advertisement

निवडणूक आणि वैवाहिक वाद

पवन सिंह आणि ज्योती सिंह यांचं नातं बराच काळ वादात आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत दोघेही एकत्र प्रचार करताना दिसले होते. ज्योती सिंह त्या काळात पतीच्या प्रचारात सक्रिय होत्या. परंतु निवडणुकीनंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. यानंतर ज्योती सिंह यांनी स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आणि परिसरात लोकांशी संपर्क ठेवू लागल्या. त्यामुळे वैयक्तिक वाद आणि राजकीय महत्त्वाकांक्षा या दोन्ही कारणांनी या नात्यावर प्रश्न निर्माण झाले.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया

ज्योती सिंह यांचं हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं आहे. काही चाहते ज्योतींच्या वेदना योग्य असल्याचं सांगत आहेत आणि पवन सिंह यांनी पत्नीला आधार द्यावा अशी मागणी करत आहेत. तर काहींचं मत आहे की वैयक्तिक वाद सार्वजनिक करणं चुकीचं आहे.

चाहत्यांचा एक गट असंही म्हणतो की या वादाचा राजकीय परिणाम होऊ शकतो. कारण लोकसभा निवडणुकीनंतर ज्योती सिंह यांनी स्वतंत्र राजकीय कारकीर्द सुरू करण्याची घोषणा केली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
अभिनेत्याचे अश्लील चाळे, अभिनेत्रीच्या कंबरेत हात; संतापलेली बायको म्हणाली, 'जीव देण्याशिवाय पर्याय नाही'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल