TRENDING:

Sharad Ponkshe: 'लोक माझ्या मरणाची वाट पाहत आहेत' शरद पोंक्षेंचा धक्कादायक खुलासा

Last Updated:

Sharad Ponkshe: मराठी सिनेसृष्टीतील शरद पोंक्षे हे ज्येष्ठ नेते आहेत. कोणताही विषय असो ते नेहमीच आपलं परखड मत मांडतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील शरद पोंक्षे हे ज्येष्ठ नेते आहेत. कोणताही विषय असो ते नेहमीच आपलं परखड मत मांडतात. अशातच आता शरद पोंक्षे 40 वर्ष जुनं नाटक घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिनेते रंगभूमीवर परतणार म्हटल्यावर प्रेक्षकांचा आणि त्यांच्या चाहत्यांचा उत्साह भरपूर आहे. मात्र काहींनी त्यांना ''अजूनही जिवंत कसे?'' असेही प्रश्न विचारल्याचं पोंक्षेंनी सांगितलं.
शरद पोंक्षेंचा धक्कादायक खुलासा
शरद पोंक्षेंचा धक्कादायक खुलासा
advertisement

शरद पोंक्षे लवकरच 40 वर्ष जुनं नाटक ''पुरुष'' पुन्हा रंगभूमीवर आणणार आहेत. या नाटकाच्या निमित्तानं त्यांनी ABP माझाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.

Tejashree Pradhan: 'मी 25 व्या वर्षी लग्न केलं पण...' घटस्फोटाच्या 10 वर्षांनी पहिल्यांदाच बोलली तेजश्री प्रधान

''पुरुष'' नाटकाच्या संपूर्ण टीमसह शरद पोंक्षेंनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खुलासा केला की, अनेकजण त्यांच्या मरणाची वाट पाहतात. सोशल मीडियावर पोस्टखाली ते कमेंट करत माझ्या मरणाच्या गोष्टी करतात. अनेकजण मला शिव्या घालतात, अनेकांनी म्हटलं तू मुलीला अमेरिकेला शिकायला पाठवलं. ते पुढे म्हणाले ''पुरुष'' नाटकाची पोस्ट टाकली मात्र लोक कमेंट करत अगदी वेगळ्याच गोष्टी मला विचारत होते.

advertisement

''अजून जिवंत कसा?'' अशा कमेंटवर रिप्लाय देताना शरद पोंक्षे म्हणाले, ''मरणाची वेळ आणि ठिकाण ठरलेलं आहे, हे लक्षात ठेवा. ती वेळ आणि ठिकाण आल्याशिवाय मला कोणीच मारू शकत नाही. त्यामुळे मला त्याची भीती नाही.''

पुढे ते म्हणाले, ''मध्ये एकदा 2019 मध्ये अशीच वेळ आलेली, पण ती ठरलेली वेळ आणि ठिकाण नव्हतं, त्यामुळे त्यातूनही बाहेर आलो मी. हा तर पोटात गोळा आला असेल लोकांच्या की हा अजून कसा मरत नाही. अजून शरद पोंक्षे मेला नाही वाटतं हा, अजूनही जिवंत आहे वाटतं हा, असंस्कृतपणाचा कळस ठायी ठायी दिसतो. त्यामुळे 'हाथी चले अपनी चाल, कुत्ते तो भोंकते रहते है', त्यामुळे आपण काही घाबरण्याचं कारण नाही. कोण काय करणार आहे....'' शरद पोंक्षेंचं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तहसीलदाराच्या टेबलावर पैशाचा पाऊस, जालन्यात खळबळ, नेमकं काय घडलं? Video
सर्व पहा

दरम्यान ज्येष्ठ नाटककार जयवंत दळवी यांचं ''पुरुष'' नाटक जवळपास 40 वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाचे 50 प्रयोग होणार आहेत. यवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त हे नाटक असणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Sharad Ponkshe: 'लोक माझ्या मरणाची वाट पाहत आहेत' शरद पोंक्षेंचा धक्कादायक खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल