Tejashree Pradhan: 'मी 25 व्या वर्षी लग्न केलं पण...' घटस्फोटाच्या 10 वर्षांनी पहिल्यांदाच बोलली तेजश्री प्रधान
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
'होणार सून मी या घरची' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रसिद्धीच्या झोतात आली आणि घराघरांत पोहोचली. या मालिकेनं तेजश्री प्रधानला खूप लोकप्रियता मिळवून दिली.
मुंबई : 'होणार सून मी या घरची' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रसिद्धीच्या झोतात आली आणि घराघरांत पोहोचली. या मालिकेनं तेजश्री प्रधानला खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि आज ती यशाच्या शिखरावर आहे. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लग्न, लिव्ह इन ते दुसरं लग्न याविषयी मनसोक्त बोलली.
तेजश्री प्रधानने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिने रिलेशनशिप, प्रेम, लग्न यावर तिने दिलखुलास गप्पा मारल्या.
काय म्हणाली तेजश्री प्रधान?
रिलेशनशिप, प्रेम, लग्न यावर तेजश्री प्रधान म्हणाली, "मुली 25-30 वर्षांच्या मुली चुकीच्या प्रेमात पडतात. स्मार्ट आणि कूल मुलं मुलींना आवडतात मात्र ही फक्त स्वप्नाळू मुलं असतात. खऱ्या आयुष्यात तुम्हाला स्थैर्य आणि खात्री देणारा मुलगा हवा असतो."
advertisement
30 च्या आत लग्न करण्याचं मुलींवर खूप प्रेशर होतं. पण आता करिअर आणि लग्न या दोन्हीवर लक्ष केंद्रित करणं अवघड जातं. त्यामुळे आता प्रत्येकाचे याविषयी वेगवेगळी मतं आहेत. यावर तेजश्री म्हणाली, "मला नेहमीच लग्न करायचं होतं. 25 मध्ये लग्न करायचं होतं आणि मी ते केलंही. पण देवाचे माझ्यासाठी काही वेगळे प्लॅन होते."
advertisement
"मला आत्ताची झेनजी गोष्टींची भीती वाटते. रेड फ्लॅग आणि ग्रीन फ्लॅग बोलतोय. बेन्चिंग आणि सिच्वेशनशीप याचा काही फायदा होणार नाहीये. हे फार वाईट आहे. मला ही जनरेशन योग्य वाटते मात्र काही गोष्टी आहेत ज्याविषयी माझं वेगळं आणि ठाम मत आहे."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 20, 2024 5:33 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Tejashree Pradhan: 'मी 25 व्या वर्षी लग्न केलं पण...' घटस्फोटाच्या 10 वर्षांनी पहिल्यांदाच बोलली तेजश्री प्रधान


