Stock एक्सचेंजला दिलेल्या अपडेट्सनंतर गुंतवणूकदारांमध्ये खळबळ; मार्केटचा ‘सुपर-मूव्हर’ कोण? क्लोजिंगनंतरच्या धडाकेबाज अपडेट्स
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी एक्सचेंजवर केलेल्या मोठ्या खुलाशांमुळे गुंतवणूकदारांचे लक्ष उद्याच्या सत्रावर खिळले आहे. या अपडेट्सचा थेट परिणाम अनेक स्टॉक्सच्या दिशेवर होऊ शकतो, म्हणून उद्याच्या मार्केटमध्ये तुफानी हालचाल अपेक्षित आहे.
advertisement
Siemens Ltd ने आपल्या Low Voltage Motors आणि Geared Motors व्यवसायाच्या विक्रीसाठी मंजुरी दिली आहे. हा व्यवसाय सुमारे 2,200 कोटी एंटरप्राइज मूल्यावर Innomotics India कडे स्लंप-सेल बेसिसवर ट्रान्सफर केला जाईल. ही डील जून 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, आवश्यक रेग्युलेटरी मंजुरींवर अवलंबून.
advertisement
IndiGo (InterGlobe Aviation) Moody’s ने इंडिगोच्या अलीकडील फ्लाइट कॅन्सलेशन्स व ऑपरेशनल अडचणींना कंपनीच्या क्रेडिट प्रोफाइलसाठी नकारात्मक म्हटले आहे. FDTL (Flight Duty Time Limitations) नियमांबाबत योग्य नियोजन नसल्याने आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तरीही कंपनीची क्रेडिट रेटिंग Baa3 स्थिर आहे, मात्र FY26 मध्ये नफ्यावर दबाव येऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
BCPL Railway Infrastructure रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन आणि ओव्हरहेड इन्फ्रास्ट्रक्चर सेवांमध्ये कार्यरत BCPL Railway Infrastructure Ltd ने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) मध्ये लिस्टिंगसाठी औपचारिक अर्ज दाखल केला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स BSE वर लिस्ट आहेत आणि NSE वर लिस्टिंग झाल्यास ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि गुंतवणूकदारांचा आधार दोन्ही वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी शेअर 1.31% घसरून 72.50 वर बंद झाला.


