मधुराणीने नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर करताच ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये मधुराणीने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला असून तिने बेडवर मादक पोजमध्ये फोटो काढले आहेत. या लूकसोबतच तिने दिलेलं कॅप्शनही लक्ष वेधून घेणारं होतं – “फक्त या उन्हाळ्यानेच एवढे हॉट का असावे?” या फोटोंमध्ये मधुराणी खरोखरच हॉट दिसत आहे. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मात्र काहींना तिचा हा अंदाज आवडला नाही. या फोटोशूटमुळे मधुराणीला टीकेचाही सामना करावा लागला आहे.
advertisement
भूकेने तडफडत होती शाहरुख खानची आजी, पोटचा पोरगा गेला सोडून, अखेर झाला दुर्दैवी अंत!
दरम्यान, मधुराणीने आता तिच्या या फोटोशूटबाबत स्पष्टीकरण दिले आहे. "आपण अनेकदा आपल्यातली वेगळी बाजू पाहिलेली नसते. आपणच ती बघितलेली नसली, तर इतरांना कशी दिसेल? एखादा माणूस वेगवेगळा असतो. आपण त्याला एकाच पठडीत बसवतो, कारण आपल्याला ते आवडतं, ते सोयीचं असतं. कलाकारानं मात्र एकसारखं असून चालत नाही. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे माझं खरं वय तेच आहे, अनेकांना असं वाटतं; पण खरं तसं नाहीये. त्यामुळे कलाकार म्हणून ती प्रतिमा मोडण्यासाठी, स्वतःतलं नवं काही शोधण्यासाठी वेगळ्या रुपात येणं गरजेचं होतं." असं मधुराणी म्हणाली.
या नव्या लूकमुळे अनेकांनी तिला ट्रोल केलं, काहींनी तिच्यावर टीका केली. पण ती त्या सगळ्यावर खंबीरपणे म्हणते, 'मला काही नाटकांसाठी विचारलं जातंय. पण मी ‘आई’, ‘घरची बाई’ अशा भूमिकांमध्ये न बसणाऱ्या भूमिकांचा विचार करतेय. कारण त्या प्रतिमेतून बाहेर पडणं गरजेचंच आहे. मधुराणी वेगळी कशी दिसू शकते, हे लोकांना कळायला हवं. तिचं खरं वयसुद्धा समजायला हवं.'
फोटोशूटविषयी बोलताना ती म्हणाली, "जेव्हा तुमच्यातलीच एखादी बाजू तुम्हालाच माहीत नसते, तेव्हा ती इतरांना कशी दिसणार? म्हणूनच ही वेगळी बाजू स्वतःपुढे आणि प्रेक्षकांपुढे मांडणं गरजेचं आहे."
आता मालिकेनंतर मधुराणीला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्ससाठी विचारणा सुरू झाली आहे. पण ती पुन्हा एकदा ‘आई’, ‘घरची बाई’ अशा भूमिकांमध्ये गुरफटून न पडता, स्वतःचं नवं रूप रंगमंचावर, स्क्रीनवर दाखवण्यासाठी सज्ज आहे.
