भूकेने तडफडत होती शाहरुख खानची आजी, पोटचा पोरगा गेला सोडून, अखेर झाला दुर्दैवी अंत!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Actress Painful Death Story : ४०-५० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, ज्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं, पण आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत त्यांनी एकाकीपण आणि उपेक्षा सहन केली.
मुंबई : बाहेरून पाहणाऱ्या प्रत्येकालाच बॉलिवूडचं जीवन हे अतिशय ग्लॅमरस आणि आरामदायी वाटतं. मात्र या आकर्षक दुनियेच्या दुसऱ्या बाजूला काय घडत असतं याबाबत खूप कमी लोकांनाच माहित असतं. अशीच एक कहाणी आहे ४०-५० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अचला सचदेव यांची. ज्यांनी सिनेमात अनेक आई, आजी अशा भूमिका साकारत प्रेक्षकांचं प्रेम कमवलं, पण आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत मात्र त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली होती.
आज अनेक प्रेक्षक त्यांना 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मधील काजोलची आजी किंवा 'कभी खुशी कभी गम'मधील शाहरुखची आजी म्हणून ओळखतात. पण अचला सचदेव यांची कारकीर्द ही केवळ वृद्ध पात्रांपुरती मर्यादित नव्हती. एकेकाळी त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होत्या. 'वक्त', 'मंजिल', 'बंधन', 'प्रेम पुजारी' यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं.
advertisement
पण या तेजस्वी कारकिर्दीनंतर, अचलाजींचं खऱ्या आयुष्यातलं पडद्यामागचं जीवन फारच त्रासदायक ठरलं. पतीच्या निधनानंतर त्यांची मानसिक व शारीरिक अवस्था दिवसेंदिवस ढासळत गेली. घरात मुलं असूनही कोणतीही साथ न मिळाल्यामुळे त्या पूर्णपणे एकट्या पडल्या. एका नोकराच्या आधारावर त्या म्हातारपण जगत होत्या. जेव्हा त्यांची तब्येत अधिक बिघडली तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण धक्कादायक बाब म्हणजे, त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांना तिथं एकटं टाकून निघून गेला.
advertisement
एकेकाळी ज्यांनी सुपरस्टार्ससोबत काम केलं, ज्या स्वतः सुपरस्टार होत्या, त्याच अचला सचदेव यांचं असं एकाकी, उपेक्षित आयुष्य खरंच मन हेलावून टाकणारं होतं. अखेर वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज त्या आपल्यात नाहीत, पण त्यांच्या अभिनयाच्या आठवणी आणि आयुष्याची खंत मनात घर करून राहते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 14, 2025 6:07 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
भूकेने तडफडत होती शाहरुख खानची आजी, पोटचा पोरगा गेला सोडून, अखेर झाला दुर्दैवी अंत!









