अभिनेता ललित प्रभाकर याने मालिकेत आदित्यची भूमिका साकारली होती तर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं मेघनाची भूमिका साकारली होती. दोघांना या मालिकेनं प्रसिद्ध, नाव आणि फेम मिळवून दिलं. त्यामुळे त्यांच्यासाठीही ही मालिका खूप खास होती. ललित आणि प्राजक्ता अनेक वर्षांनी महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर एकत्र आले. दोघांनी एकमेकांबरोबर डान्स केला. दोघांचा रोमँटीक डान्स पाहायला मिळाला.
advertisement
( 'या' हिरोसोबत होणार होतं प्राजक्ता माळीचं लग्न? अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'तिची आई माझ्याकडे...' )
अभिनेता ललित प्रभाकरचा प्रेमाची गोष्ट 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ललित अनेक ठिकाण दिसतोय. प्रमोशनसाठी तो महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर पोहोचला. प्राजक्ता हास्यजत्रेची होस्ट आहे. ललितचं आपल्या शोमध्ये स्वागत करताना प्राजक्ता प्रचंड आनंदी होती.
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या आगामी एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यात पाहायला मिळतंय की, प्राजक्ता शो होस्ट करतेय. तेवढ्यात ललित तिला म्हणतो, प्राजक्ता, प्रेमाच्या गोष्टीचा विषय चालू होता ना, तर तुझी आठवण आली. त्यावर लाजून प्राजक्ता म्हणते, अगं बाई.. ललित तिला म्हणतो, गाण्यातील दोन ओळी मला तुझ्याबरोबर परफॉर्म करायला आवडतील.
त्यानंतर ललित आणि प्राजक्ता प्रेमाची गोष्ट 2मधील ओल्या सांज वेळी या गाण्यावर रोमँटीक डान्स करतात. गाण्याची हुक स्टेप करता करता दोघे एकमेकांना मिठी मरतात. दोघांचा हा रोमँटीक अंदाज पाहून चाहत्यांना जुळून येती रेशीमगाठीमधल्या आदित्य आणि मेघनाची आठवण झाली. चाहत्यांनी प्रचंड आनंद व्यक्त केलाय.