प्राजक्ता माळी ही महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ताच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. काही दिवसांआधी प्राजक्ताला एका शेतकऱ्यानं लग्नाची मागणी घातली होती. ज्याचं प्राजक्तानं कौतुक केलं होतं. पण प्राजक्ताला कोणाशी लग्न करायचं आहे.
( Prajakta Gaikwad Husband : गायकवाडांची प्राजक्ता होणार राजकीय कुटुंबाची सून! शंभुराज आहे तरी कोण? )
राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं तिच्या लग्नाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, "मी लग्न करावं यासाठी माझी आई हात धुवून माझ्या मागे लागली आहे. मी तिला इतके दिवस फुलवंती झाल्यानंतर... फुलवंती झाल्यानंतर...फुलवंती झाल्यानंतर असं सांगत होती. आता फुलवंती झाल्यानंतर तिचं पुन्हा सुरू झालंय. त्यामुळे मला भिती वाटत आहे."
लग्नाविषयी प्राजक्ता म्हणाली होती, "मी एके ठिकाणी वाचलं होतं की, तीन गोष्टींमुळे कोणतेही निर्णय होतात. एक जे आपोआपच होतात. माझं इंडस्ट्रीत येणं आपोआपच ठरलं. कोणी ते ठरवलं नव्हतं. दुसरं म्हणजे मुद्दामून घेतलेला निर्णय. फुलवंती करायचा हा निर्णय माझा होता. तिसरं म्हणजे तिसरा व्यक्ती आपल्यासाठी निर्णय घेतो. आई-वडील आपल्या डोक्यावर बसतात आणि आपल्याकडून ते करवून घेतात. पहिल्या दोन कॅटेगिरीत माझं लग्न होणार नाही. युनिव्हर्सलाच मी सिंगल राहायला हवं आहे. मी पण लग्नाच्या झोनमध्ये नाही. पण माझ्या आईची इच्छा आहे की मी लग्न करावं."
प्राजक्ता पुढे म्हणाली, "आमच्या इंडस्ट्रीत ते खूप कठीण आहे. तुम्हाला पैसा, प्रसिद्धी मिळेल पण प्रेम मिळणार नाही. सगळंच देव कसं देईल हे मी स्वीकारलं आहे. तो एक प्रकारचा त्याग आहे. पुढे माझं लग्न झालं नाही झालं तरी मी कौटुंबिक आयु्ष्याला प्राधान्य देऊ शकत नाही. मी फ्रंट सीट आणि नवरा बॅक सीटवर असं पाहिजे आता माझे हे विचार कोणी समजू शकला तर... आणि तो माझ्या आयुष्यात आपोआपच आला तर तेव्हा मी निर्णय घेईन. पण त्याला शोधण्याचे प्रयत्न मी करणार नाही."
मध्यंतरी आम्ही असं ऐकलंय या शोमध्ये बोलताना प्राजक्ता म्हणाली होती, "मी आता घरच्यांना रिस्ट्रीक्ट नाही केलंय. आधी मी म्हणायचे, तुम्ही नका डोकेदुखी करु, माझ्या डोक्याला शॉट नका देऊ. पण मी आता म्हटलं ओके, गो विथ द फ्लो."
प्राजक्ता पुढे म्हणाली, "आईला मी आता फायनली परवानगी दिली आहे की, तू माझ्यासाठी मुलगा शोध. मी असं उडतं उडतं कुठेतरी बोलले होते आणि आईला खरंच दोन पत्र आलीत. त्यातलं एक तर मला खूपच आवडलं. त्यामध्ये त्याने अतिशय प्रांजळपणे असं म्हटलंय की, मी शेतकरी आहे. मला माहितीय हे काहीतरी खूपच वेगळं बोलतोय. तुमचं प्रोफेशन वेगळं आहे. पण मला हे प्रांजळपणे मांडायचंय की मी शेतकी आहे आणि मी शेतीच करणार तुम्हाला आवडणार असेल तर मला करायचंय लग्न. मला ते खूप आवडलं, मी म्हटलं किती गोड आहे हे."