Prajakta Gaikwad Engagement : प्राजक्ता गायकवाडच्या आयुष्यात 'शंभूराज'ची एंट्री! साखरपुड्याचा VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Gaikwad Engagement : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने तिच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. नुकतंच प्राजक्ताचा साखरपुडा पार पडला आहे.
मुंबई : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली आणि 'महाराणी येसूबाईं'च्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने नुकताच आपल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच 'ठरलं! कुंकवाचा कार्यक्रम' अशी पोस्ट शेअर करून तिने तिचं लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली होती, आणि आता तिचा साखरपुडा पार पडला आहे.
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव काय?
प्राजक्ताच्या साखरपुड्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत दिसत आहे. विशेष म्हणजे, प्राजक्ताच्या होणाऱ्या पतीचं नावही शंभूराज आहे.
या व्हिडिओमध्ये प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज घातला आहे. या ब्लाऊजवर खास 'शंभूराज' असं लिहिलेलं आहे. तर तिचा होणारा पती पांढऱ्या रंगाच्या जोधपुरी सूटमध्ये आहे आणि त्याच्या कोटवर 'प्राजक्ता' असं लिहिलेलं आहे. त्या दोघांनीही त्यांच्या या पेहरावातून एकमेकांबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.
advertisement
advertisement
मालिकेतली 'येसूबाई' आता खऱ्या आयुष्यात 'शंभूराज'ची राणी!
प्राजक्ता गायकवाडने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका इतकी अप्रतिम साकारली होती की ती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता खऱ्या आयुष्यातही तिच्या आयुष्यात 'शंभूराज'ची एंट्री झाल्यामुळे ही गोष्ट तिच्या चाहत्यांसाठी खूप खास आहे.
प्राजक्ताने आतापर्यंत 'नांदा सौख्य भरे', 'संत तुकाराम', 'आई माझी काळुबाई' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता ती तिच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 6:28 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Prajakta Gaikwad Engagement : प्राजक्ता गायकवाडच्या आयुष्यात 'शंभूराज'ची एंट्री! साखरपुड्याचा VIDEO VIRAL


