'खालिद का शिवाजी' चित्रपट प्रदर्शित होणार नाही! वाद विकोपाला, सेन्सॉर बोर्डाने पाठवली नोटीस
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Khalid Ka Shivaji Movie Controversy : चित्रपट 'खालिद का शिवाजी' वादामुळे उद्या प्रदर्शित होणार नाही. केंद्र सरकारने दखल घेतल्याने प्रदर्शन थांबवले.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'खालिद का शिवाजी' या चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाने आता एक धक्कादायक वळण घेतलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप होत असतानाच, आता हा चित्रपट उद्या ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार नाही, अशी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने या वादाची गंभीर दखल घेतल्यामुळे चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं थांबवण्यात आलं आहे, अशी माहिती मिळाली आहे.
सेन्सॉर बोर्डाने पाठवली नोटीस
'खालिद का शिवाजी' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काही आक्षेपार्ह दावे करण्यात आले होते. 'शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम सैनिक होते' आणि 'रायगडावर मशीद होती' असे दावे ऐतिहासिक पुराव्यांशिवाय केल्यामुळे शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या.
advertisement
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सेन्सॉर बोर्डाने आता चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनानोटीस बजावली आहे. या नोटिसीमध्ये चित्रपटातील आक्षेपार्ह भागांवर स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. या चौकशीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन रखडलं आहे.
'कान्स'मधूनही चित्रपट मागे
या वादाचा आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे, हा चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या 'फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळा'ने अधिकृतपणे कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवला होता. पण हाच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी संताप व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता 'कान्स रेकॉर्ड'मधूनही हा चित्रपट मागे घेण्यात आला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक अडचणीत आले आहेत. आता सेन्सॉर बोर्डाच्या नोटीसला ते काय उत्तर देतात आणि हा वाद पुढे काय रूप घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 07, 2025 5:09 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'खालिद का शिवाजी' चित्रपट प्रदर्शित होणार नाही! वाद विकोपाला, सेन्सॉर बोर्डाने पाठवली नोटीस


