बिग बॉस 19 च्या चौथ्या आठवड्यात घरात चांगलीच भांडणं झाली. एकटा प्रणित मोरे अमाल मलिक आणि बसीर अली यांना सामोरं जात होता. बसीर अलीने प्रणित मोरेला नको नको त्या शब्दांत ट्रोल केलं. दोघांनी प्रणितला त्याच्या रंगावरून, कामावरून हिणवलं. तु तुझ्या गावाला निघून जा म्हणत त्याला वाईट शब्दांत ट्रोल केलं. या सगळ्यांची चर्चा विकेंड का वारला झाली. सलमान खानने सगळ्यांना चांगलंच धारेवर धरलं.
advertisement
( शाहरुखच्या कानाखाली मारली, पुन्हा दिसलीच नाही; 20 वर्षांपासून अभिनेत्री कुठे गायब झाली? )
बिग बॉस 17ची विजेती गौहर खान विकेंड का वारला आली होती. तिने प्रणित मोरे आणि बसीर अली यांच्यातील भांडणाचा मुद्दा काढला. तिने बसीरला चांगलंच सुनावलं. गौहरला सलमान खानने देखील पाठिंबा दाखवला. गौहर म्हणाली, बसीर प्रणितला तुमच्या गावी परत जा असं म्हणाला. आपला देश आपल्या गावांमुळेच आहे. इथे गाव आहे म्हणून आपल्याकडे वीज, अन्न आणि बरंच काही आहे. त्यामुळे आपल्याला गावाकडून आल्याचा अभिमान वाटला पाहिजे.
गौहरच्या बोलण्याचं समर्थन करत सलमान खानने बसीरची चांगलीच शाळा घेतली. सलमान म्हणाला, बसीर हे काय आहे, कोणाच्या रंगावर जाणं, लुक्सवर जाणं... आणि हे काय आहे गावी परत जा. प्रणित कोणत्या गावावरून आलाय. पुणे गाव आहे... त्यावर बसीर म्हणतो, सर मला माहितीही नाही तो कुठून आलाय. त्यावर सलमान त्याला झापतो. म्हणतो, मग तू असं कसं बोलू शकतो. अशी विधानं तुलाच गोत्यात आणू शकतात. मी पण गावावरून आलोय यार, आम्ही पण खेती वाडीतून आलोय. माणूस काम करण्यासाठी गावातून शहरात येतो. काम करतो, मेहनत करतो आणि मग फार्महाऊस खरेदी करतो. सलमान खानचं हे बोलणं एकूण प्रणितला अश्रू अनावर होतात. प्रणित ढसाढसा रडायला लागतो. प्रणितला रडताना पाहून सगळे त्याला धीर देतात.