१४ वर्षांचा वनवास अन् २ विश्वविक्रम
प्रसाद ओकने आपल्या सोशल मीडियावरून ही आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली. त्याने सांगितलं की, २०१२ पासून तो ज्या पुरस्कारांची वाट पाहत होता, ते सर्व पुरस्कार त्याला 'धर्मवीर'ने एकाच वेळी मिळवून दिले. या अभूतपूर्व यशाची नोंद आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (India Book of Records) आणि ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड (Global Book of Excellence, England) या दोन संस्थांनी घेतली आहे.
advertisement
प्रसाद ओक हा मराठीतला पहिला असा अभिनेता ठरला आहे, ज्याला एका वर्षातील एकाच सिनेमासाठी जवळपास सर्वच मानाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले आहेत.
Bigg Boss सोबतचा वाद पेटला! दिव्या शिंदेने उपसली कायदेशीर तलवार; निर्मात्यांविरुद्ध उचललं मोठं पाऊस
प्रसाद ओकच्या शिरपेचात मानाचा तुरा
आपल्या भावना व्यक्त करताना प्रसाद कमालीचा भावूक झाला होता. तो म्हणाला, "१३ मे २०२२ रोजी 'धर्मवीर' प्रदर्शित झाला आणि त्यानंतर पुरस्कारांचा जो ओघ सुरू झाला, तो थांबलाच नाही. सुरुवातीला मला सवय नव्हती, पण वर्ष संपल्यावर लक्षात आलं की त्या वर्षातील प्रत्येक व्यासपीठावर मलाच पुरस्कार मिळाला आहे. एका मराठी कलाकाराला एका मराठी चित्रपटामुळे हा जागतिक बहुमान मिळणं, याचा मला नितांत अभिमान आहे."
या यशाचं श्रेय त्याने दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते मंगेश देसाई आणि संपूर्ण 'धर्मवीर' टीमला दिलं आहे. "हे सगळं गुरुवर्य आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हतं," असंही त्याने आवर्जून नमूद केलं.
कौतुकाचा वर्षाव अन् ग्रँड सेलिब्रेशन
या खास प्रसंगी प्रसादने एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता, जिथे त्याने आपल्या दोन्ही विश्वविक्रमांची झलक सर्वांना दाखवली. यावेळी त्याची पत्नी मंजिरी ओक ही देखील अत्यंत आनंदी दिसत होती. सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी प्रसादवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
