TRENDING:

नवऱ्याच्या मृत्यूने खचली, 2 महिन्यांनी अभिनेत्रीच्या वाट्याला आली विधवेची भूमिका, 20 वर्षांनीही सिनेमा फेमस

Last Updated:

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूनंतर प्रिया यांचे आयुष्य एका मोठ्या वादळातून गेले. लक्ष्या मामांच्या मृत्यूनंतर घडलेला एक प्रसंग त्यांनी सांगितला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  मराठी सिनेमा आणि अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार. या त्रिकुटातील एक अवलिया म्हणजेच लक्ष्या, जो फार लवकर हे जग सोडून गेला. त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. त्याच्या जाण्याने त्याचं कुटुंब खचलं. पण त्याची पत्नी प्रिया बेर्डे यांनी हार न मानता पुन्हा कामाला सुरूवात केली होती.
News18
News18
advertisement

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रियाची खास जोडी

लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया यांचा विवाह 1998 मध्ये झाला. लग्नाआधी आणि नंतरही दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. प्रिया यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपली छाप सोडली आहे. अशी ही बनवा बनवी सारख्या सिनेमातून या जोडीनं प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं.

( नवऱ्याच्या मृत्यूनंतर 2 महिन्यातच मराठी अभिनेत्रीच्या वाट्याला विधवेची भूमिका, 20 वर्षांनंतरही आहे फेमस )

advertisement

प्रियाची विधवेची भूमिका 

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूनंतर प्रिया यांचे आयुष्य एका मोठ्या वादळातून गेले. त्या दुःखद घटनेनंतर काही महिन्यांनंतर प्रिया यांना एका सिनेमाची ऑफर आली. ज्यात तिला एका विधवेचीच भूमिका साकारायची होती. तिच्यासाठी हे खूप मोठं चॅलेंज होतं.

'जत्रा' चित्रपटात एक विधवेची भूमिका करण्याची संधी मिळाली. प्रिया यांनी सांगितलं की, "लक्ष्मीकांतच्या मृत्यूला फक्त दोन-तीन महिनेच झाले होते, आणि केदारने मला फोन करून ती भूमिका विचारली." प्रियाने या सिनेमाला होकार दिला.

advertisement

अक्काची भूमिका आणि तिचा संघर्ष

प्रिया बेर्डे यांनी "जत्रा" चित्रपटात 'अक्का' ही भूमिका साकारली जी खूप कणखर होती. तिच्या भूमिकेतील साजशृंगार आणि पतीच्या निधनानंतरही तिचं नटलेलं व्यक्तिमत्त्व लोकांना आवडलं. प्रिया यांनी सांगितलं, "माझ्या आयुष्यातील तो काळ खूप त्रासदायक होता. मानसिकरित्या मी खूप खचले होते पण त्यातून बाहेर पडून लोकांसमोर यायला लागलं."

advertisement

20 वर्षांनीही प्रियाची लोकप्रियता कायम

आज 20 वर्षांनीही प्रिया सिनेमा आणि मालिकाविश्वात सक्रीय आहे. जत्रा सिनेमातील प्रिया यांची आक्का ही भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
नवऱ्याच्या मृत्यूने खचली, 2 महिन्यांनी अभिनेत्रीच्या वाट्याला आली विधवेची भूमिका, 20 वर्षांनीही सिनेमा फेमस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल