TRENDING:

'या' चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार प्रियांका चोप्रा; हृतिक रोशनसोबत झळकणार देसी गर्ल?

Last Updated:

प्रियांका चोप्रा लवकरच बॉलिवूडमध्ये हृतिक रोशनसोबत एका मोठ्या बॉलीवूड प्रोजेक्टमधून जोरदार पुनरागमन करू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 01 नोव्हेंबर :  बॉलिवूडची देसी गर्ल ते ग्लोबल आयकॉन बनलेल्या प्रियंका चोप्राने बॉलिवूड नंतर हॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले. प्रियांका सध्या हॉलिवूडमध्ये एकापाठोपाठ एक मोठे प्रोजेक्ट करत आहे. मात्र, तिचे चाहते या अभिनेत्रीला बॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी आसुसले आहेत. 'जी ले जरा' या चित्रपटातून ती पुनरागमन करणार असल्याचे बोलले जात होते, परंतु अभिनेत्रीला कतरिना आणि आलियासोबत पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अपूर्णच राहिली. पण आता तिच्या नव्या बॉलिवूड चित्रपटाबाबत माहिती समोर आली आहे. यात अभिनेत्री बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन सोबत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा
हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा
advertisement

रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये हृतिक रोशनसोबत एका मोठ्या बॉलीवूड प्रोजेक्टमधून जोरदार पुनरागमन करू शकते.

Bigg Boss 17 : बिग बॉसच्या घरात नुसते भांडतायत अंकिता-विकी; अभिनेत्री म्हणाली 'आता त्याचा आवाजही सहन...'

हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा हे बॉलिवूडमधील सुपरहिट ऑनस्क्रीन जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांनी क्रिश आणि अग्निपथ सारखे यशस्वी चित्रपट प्रेक्षकांना दिले आहेत. त्यामुळेच दोघांना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीच असेल. बॉलीवूड लाईफमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, क्रिश सिरीजचा पुढचा भाग क्रिश 4 साठी या चित्रपटाचे प्रियांका चोप्राशी संपर्क साधत आहेत. याआधीही तीन भागात हृतिक रोशनसोबत प्रियांकाच झळकली होती. त्यामुळे पुढच्या भागातही प्रियांकाच असावी असा चाहत्यांचा आग्रह आहे.

advertisement

प्रियांका चोप्राने क्रिश आणि क्रिश 3 मध्ये हृतिक रोशनसोबत प्रियाची भूमिका साकारली होती. जर प्रियंका चोप्राची निर्मात्यांशी चर्चा झाली तर ते प्रियांकासाठी बॉलिवूडमध्ये मोठे पुनरागमन ठरू शकते. मात्र, आतापर्यंत या चित्रपटाचा भाग असल्याबाबत निर्माते आणि प्रियांकाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

क्रिश 4 चे शूटिंग कधी सुरू होणार?

प्रियांका चोप्राने 2019 मध्ये फरहान अख्तरसोबत 'स्काय इज पिंक' या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचे खूप कौतुक झाले. या चित्रपटानंतर ती नेटफ्लिक्सचा चित्रपट 'द व्हाईट टायगर'मध्ये राजकुमार रावसोबत दिसली होती. प्रियांकाने 2021 मध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबतचा एक फोटो शेअर करून 'जी ले जरा'ची घोषणाही केली होती, परंतु सध्या हा चित्रपट स्थगित करण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

या मीडिया रिपोर्टमध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, चित्रपटाची स्क्रिप्ट तयार झाली असून त्याला हृतिक रोशनने मंजुरी दिली आहे. या चित्रपटाला फेब्रुवारी २०२४ मध्ये सुरुवात होऊ शकते असं म्हटलं जातंय.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'या' चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार प्रियांका चोप्रा; हृतिक रोशनसोबत झळकणार देसी गर्ल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल