नेमकं काय घडलं?
मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने कलावंत ढोल ताशा पथकाला विसर्जन मिरवणुकीसाठी बोलावलं होतं. संध्याकाळी 6 वाजता पथक ठरलेल्या जागी पोहोचलं. कलाकारांनी वेशभूषा केली होती, ढोल-ताशा सज्ज होते. पण मिरवणुकीचा वेग इतका कमी होता की टिळक रोडवर ती पुढेच सरकली नाही. तब्बल तीन तास थांबूनही परिस्थिती बदलली नाही.
VIDEO: अक्षय कुमारसह अमृता फडणवीसांचं Clean Up, पोहोचले जुहू चौपाटीवर
advertisement
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत तासन्तास वाट पाहूनही वादन करण्याची संधी न मिळाल्यामुळे कलावंत ढोल ताशा पथकाला मोठा धक्का बसला. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा समावेश असलेलं हे पथक नेहमीच प्रेक्षकांचं खास आकर्षण ठरतं. मात्र यंदा संपूर्ण तयारी करूनही त्यांना आपली कला सादर करता आली नाही.
शेवटी रात्री 9 वाजता पथकाने एक गजर करून, ध्वजवंदन करत वादन थांबवण्याचा निर्णय घेतला. चाहत्यांची गर्दी त्यांना पाहण्यासाठी जमली होती, पण त्यांचा हिरमोड झाला. पथकाच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट करत त्यांनी चाहत्यांची माफी मागितली. "पुढच्या उत्सवात नक्की भेटूया," असा दिलासा दिला. श्रुती मराठेने तिच्या स्टोरीवर ही पोस्ट शेअर करत खंत व्यक्त केली.
shruti marathe
या पथकात श्रुती मराठे, सिद्धार्थ जाधव, अनुजा साठे, तेजस्विनी पंडित, सौरभ गोखले असे अनेक कलाकार आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. मात्र यावेळी सर्वांचाच हिरमोड झाला.