टीव्ही सिरीयलच्या मालिकेत नुसती जाहिरात असते, त्यासाठी काय तर करा, असं सांगत एका आजींनी खासदार सुप्रिया सुळेंकडे अजबच मागणी केली. अशा अजब मागणीवर खासदार सुप्रिया सुळेंनाही हसू आवरलं नाही मात्र सुप्रिया सुळेंनी आश्वासन दिलं की नक्की काय तरी करू. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आजींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात त्या खासदार सुप्रिया सुळे यांना भेटतात आणि म्हणतात, 'माझी एक तक्रार आहे, आम्ही म्हातारी माणसं घरात बसून असतो. केबलला इतके पैसे भारायचे पण त्यात जाहिरातीच खंडीभर असतात, काय बघायचं सांगा. 10 मिनिटांचा कार्यक्रम असतो आणि बाकीची 20 मिनिटं तर जाहिरातीच असतात.'
advertisement
( 'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्याने उरकला साखरपुडा, बायकोही आहे फेमस अभिनेत्री )
आजी पुढे म्हणाल्या, 'मी कुठं तक्रार करू हेच मला सुचत नाही. योगायोगानं आता तुम्ही आलात त्यामुळे मला जरा बोलायला चान्स मिळाला. त्यावर तुम्हाला काहीतरी करता आलं तर बघा, तेवढी मेहरबानी होईल. कारण आमचा वेळ जात नाही. त्या जाहिराती बघून वैताग आला. खरंच सांगते तुम्हाला, एक जाहिरात दोन दोन वेळा दाखवतात.'
यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'पूर्ण एपिसोड दाखवत नाहीत का?' त्यावर आजी म्हणाला, 'नाही, थोडसंच दाखवतात. 15 मिनिटांची तर सीरियल असते, तशी 30 मिनिटांची असते.' यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, '22 मिनिटांची असते, 22 मिनिटांचा एक एपिसोड असतो'. 'तेवढी मेहबानी करून करून घ्या', अशी विनंती आजींनी केली. 'मी नक्की विचार करते', असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी आजींना दिलं.