काही महिन्यांआधी याच सिनेमाच्या शूटिंगवेळी पुष्कर जोगचा अपघात झाला होता. ज्यामुळे त्याला शूटिंग सोडून मुंबईत उपचारांसाठी यावं लागलं होतं. लंडनच्या एका रस्त्यावर अॅक्शन सीन शूट करताना पुष्कर पडला होता. ज्यात त्याच्या गुडघ्यांना जबरदस्त मार लागला होता. ज्या सीनवेळी त्याचा अपघात झाला तो सीनही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे.
(विनर झाल्यानंतर रितेश आणि सूरजमध्ये झालं खास बोलणं; पुढ्यात उभी जेनिलिया पाहतच राहिली, VIDEO)
advertisement
पुष्कर जोग या सिनेमाचा दिग्दर्शकही आहे. पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, दीप्ती लेले यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा 25 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय, एआयच्या साहाय्याने फेक व्हिडिओ बनवल्याबद्दल अरविंद धर्माधिकारीच्या मुलीला कोणीतरी किडनॅप केलं आहे. त्यांच्याकडे धमकावून पैशांची मागणी केली जात आहे. यामागे नेमके काय कारण आहे? यात धर्मा कसा अडकतोय? त्याच्या मुलीची सुटका होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिळणार आहेत.
सिनेमाचा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून पुष्कर जोग म्हणाला, "हल्ली सर्वत्र एआयचे तंत्रज्ञान फोफावतेय. ते जितके फायदेशीर आहे, तितकेच त्याचे तोटेही आहेत. याच जाळ्यात अडकलेल्या वडिलांची ही कहाणी आहे. प्रत्येक वळणावर यातील सस्पेन्स वाढणार आहे. मराठी चित्रपटाला थोडा हॉलीवूड टच देण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. यात अनेक हॉलीवूड अॅक्शन सिक्वेन्स पाहायला मिळतील. मला खात्री आहे, माझा हा प्रयत्नही प्रेक्षक नक्कीच स्वीकारतील."