रविवारी संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी काही आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या घराची तोडफोड केली होती. उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीचे (OU-JAC) सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंदोलकांनी अल्लू अर्जुनच्या मालमत्तेचे नुकसान केले.
घरावरील हल्ल्यानंतर अल्लू अर्जुनचा मोठा निर्णय
या हल्ल्यानंतर अल्लू अर्जुनने मोठा निर्णय घेतला आणि मुलांसह घर सोडून सुरक्षित स्थळी गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनने आपल्या मुलांना वडिलांच्या घरी पाठवले आहे. दरम्यान, इंटरनेटवर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अल्लू अर्हा आणि अल्लू अयान कुटुंबातील काही सदस्यांसह कारमधून परिसर सोडताना दिसत आहेत.
advertisement
त्याचवेळी, मीडियाने कारला घेरले आणि यावेळी कारमध्ये बसलेली अरहा चिंताग्रस्त दिसत होती. अल्लू अर्जुनने त्याच्या घराबाहेर झालेल्या निषेधांवर अद्याप भाष्य केले नसले, तरी त्याचे कुटुंबीय देखील चिंतेत दिसत होते. परंतु त्याचे वडील, निर्माता अल्लू अरविंद यांनी रविवारी रात्री मीडियाशी संवाद साधला आणि झालेल्या प्रकाराचा निषेध केला.
अल्लू अरविंद यांनी केला हल्ल्याचा निषेध
अल्लू अरविंद यांनी या हल्ल्याचा निषेध करत अशा घटनांना प्रोत्साहन देऊ नये, असे सांगितले. अल्लू अर्जुनसोबत घरी पत्रकारांशी बोलताना अल्लू अरविंद म्हणाले, "आज आमच्या घरी जे घडले ते सर्वांनी पाहिले आहे. पण आता वेळ आली आहे की आपण त्यानुसार वागू. आता आमच्यासाठी कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची ही योग्य वेळ नाही."
ते पुढे म्हणाले की, "पोलिसांनी तोडफोड करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ते म्हणाले, 'येथे गोंधळ घालण्यासाठी कोणीही आले तर त्यांना घेऊन जाण्यास पोलिस तयार आहेत. अशा घटनांना कोणीही प्रोत्साहन देऊ नये. पण केवळ मीडिया इथे आहे म्हणून मी प्रतिक्रिया देणार नाही. आता संयम बाळगण्याची वेळ आहे. कायदा त्याचे काम करेल." दरम्यान, निदर्शनांप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.