रजनीकांतला पाहताच त्यांच्या घराबाहेर चाहत्यांनी 'हॅपी दिवाली थलायवा' असा जल्लोष केला होता. रजनीकांतनेही चाहत्यांसोबत प्रेम व्यक्त करत हात हालवला. मीडियाशी संवाद साधताना आपल्या जगभरातील चाहत्यांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या आवडत्या स्टारसाठी जोरदार जल्लोष करताना चाहते दिसून आले.
बॉलिवूडचा मोठा स्टार, पण अंत्यसंस्कारला फक्त 15 जणच; कारण काय?
रजनीकांतचा व्हिडीओ व्हायरल
रजनीकांतचा दिवाळी स्पेशल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांसोबत प्रेमाने संवाद साधल्याने, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबाबात नेटकरी रजनीकांतचं कौतुक करत आहेत. 'सुपर थलायवा','हॅपी दिवाली थलायवा' अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.
रजनीकांतचं चाहत्यांना दिवाळी गिफ्ट
रजनीकांतचा आगामी 'जेलर 2' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक बीटीएस व्हिडिओ दिवाळीनिमित्त खास सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सन पिक्चर्सने सोशल मीडियावर बीटीएस व्हिडिओ शेअर करत लिहिलं आहे,"सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.'जेलर 2'चा एक खास बीटीएस व्हिडिओ, हॅप्पी दिवाळी." 'जेलर 2'च्या बीटीएस व्हिडिओमध्ये दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध सेटवर मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये रजनीकांत नेल्सनला शॉटबद्दल सूचना देताना देखील दिसत आहेत. त्यानंतर एकाचवेळी तीन कार्सचा स्फोट होताना दाखवले आहे. शेवटी रजनीकांत आपल्या खास शैलीत "हॅप्पी दीपावली" म्हणत शुभेच्छा देताना दिसतात.