सचिन पिळगांवकर राजकुमार बडजात्या यांना राजा बाबू म्हणायचे. दोघांनी एकत्र 'अखियोंके झरोको से', 'गीत गाता चल', 'गोपाल किशन', 'नदीया के पार' आणि 'जाना पेहचाना' सारखे सिनेमे केले. हे सिनेमे सचिन यांच्या करिअरमध्ये मैलाचे दगड ठेवले.
advertisement
राजा बाबू यांच्या निधनानंतर त्यांच्या नातवानं सचिन पिळगांवकरांना हा किस्सा सांगितला होता. सचिन पिळगांवकर यांना राजू बाबू यांच्या मृत्यूची बातमी मिळताच ते अंत्यदर्शनासाठी पोहोचले तेव्हा सूरज बडजात्या यांनी त्यांना सांगितलं की, माझ्या मुलाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे.
सचिन यांनी मुलाखतीत सांगितलं, "राजकुमार यांना रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. राजा बाबू झोपले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा नातू बसला होता. तेव्हा त्याने त्यांना विचारलं की, तुमची इच्छा काय आहे. तुमची शेवटी इच्छा काय असं नाही विचारलं."
तेव्हा ते हसून म्हणाले, "मला ते सचिनचं गाणं दाखवा श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम... मला सचिनला बघायचं आहे." हे सांगताना सचिन पिळगांवकर भावुक झाले. ते पुढे म्हणाले, "त्याने मग मोबाईलमध्ये ते गाणं त्यांना दाखवलं. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला."
राजश्री प्रोडक्शनला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सचिन पिळगांवकर यांनी राजश्रीला दिलेल्या मुलाखतीत ही आठवण सांगितली होती. त्यांच्या मुलाखतीमधील हा किस्सा पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.