आईच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी सेटवर परतला
आपण बोलत असलेला हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून राजकुमार राव आहे. 2017 मध्ये 'न्यूटन' चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. त्याच काळात राजकुमारच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. त्याची आई कमलेश यांचे निधन झाले. सामान्य माणसाला अशा वेळी सावरायला महिने लागतात, पण राजकुमार दुसऱ्याच दिवशी कॅमेऱ्यासमोर उभा राहिला.
advertisement
1983 चा ब्लॉकबस्टर, अमिताभ बच्चन मृत्यूला चकमा देऊन पोहोचले शूटिंगला, नेमकं काय घडलं होतं?
कारण काय? तर आईलाही त्याचा कामाबद्दलचा जिव्हाळा आणि प्रामाणिकपणा माहित होता. त्यानेच सांगितलं होतं, "आईला हवं होतं की मी माझ्या स्वप्नांसाठी लढत राहावं." 2019 मध्ये, वडील सत्यपाल यादव यांचेही निधन झाले. दोन वर्षांच्या अंतरात आई-वडील दोघांना गमावणं कोणासाठीही कठीण असतं. पण राजकुमारने या दु:खाला ताकद बनवलं. त्याचं म्हणणं असतं, "त्यांनी मला संघर्ष करण्याची हिंमत दिली, मी ती सोडणार नाही."
दरम्यान, गुरुग्राममध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून राजकुमारने दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. महाविद्यालयीन काळात तो थिएटरमध्ये रमला. क्षितिज थिएटर ग्रुप आणि श्रीराम सेंटरमधील नाटकांनी त्याचा पाया मजबूत केला. यानंतर एफटीआयआय, पुण्यात त्याने अभिनयाची खरी शाळा केली. त्याने स्वतः सांगितलंय, “FTII मध्ये शिकलो नसतो तर मी आज इथे नसतो.”
मुंबईत येऊन त्याने असंख्य ऑडिशन्स दिल्या. अनेकदा रिजेक्ट झाला. छोट्या जाहिरातींमध्ये काम केलं. पण 2010 मध्ये दिबाकर बॅनर्जीच्या लव्ह, सेक्स और धोखा ने त्याला ब्रेक दिला. 2013 चा शाहिद हा त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरला. वकील शाहिद आझमीच्या भूमिकेसाठी त्याने कुराण वाचलं, न्यायालयीन प्रक्रियांचा अभ्यास केला. त्याला राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्ड मिळाला. क्वीन, अलीगढ, ट्रॅप्ड, न्यूटन या चित्रपटांनी त्याचा दर्जा वेगळाच बनवला. स्त्री ने त्याला व्यावसायिक यश मिळवलं, तर स्त्री 2 बॉक्स ऑफिसवर त्याचा सर्वात मोठा हिट ठरला.
आता सगळ्यांच्या नजरा त्याच्या आगामी प्रोजेक्टवर आहेत सौरव गांगुली बायोपिक. 2026 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. गांगुलीच्या भूमिकेसाठी राजकुमार कठोर तयारी करत आहे. क्रिकेट ट्रेनिंगपासून शारीरिक फिटनेसपर्यंत तो पूर्ण लक्ष घालत आहे.