TRENDING:

जुळ्या मुलांचा बाप झाला, पण लेकरांना बघायला जाताना राम चरणसोबत घडला भयंकर प्रकार, VIDEO VIRAL

Last Updated:

Ram Charan-Upasana welcomes Twins: या आनंदाच्या वातावरणात हैदराबादमधील हॉस्पिटलबाहेर असा काही राडा झाला की, ज्याचा व्हिडिओ पाहून सध्या नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हैदराबाद : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'मेगा पॉवर स्टार' राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी यांच्या आयुष्यात सध्या आनंदाचं उधाण आलं आहे. 'आरआरआर' स्टार राम चरण दुसऱ्यांदा बाबा झाला असून उपासनाने चक्क जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. ही आनंदाची बातमी खुद्द सुपरस्टार चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर शेअर करताच जगभरातील चाहत्यांनी राम आणि उपासना यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, या आनंदाच्या वातावरणात हैदराबादमधील हॉस्पिटलबाहेर असा काही राडा झाला की, ज्याचा व्हिडिओ पाहून सध्या नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
News18
News18
advertisement

चिरंजीवींनी दिली गुड न्यूज

मेगास्टार चिरंजीवी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले, "अत्यंत आनंदाने आणि कृतज्ञतेने मी ही बातमी सांगत आहे की, राम चरण आणि उपासना यांच्या घरी जुळ्या पाहुण्यांचं आगमन झालं आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे. आई आणि दोन्ही बाळं सुरक्षित आहेत. आजी-आजोबा म्हणून आम्हाला मिळालेला हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे." या बातमीमुळे कोनिडेला कुटुंबात सध्या सणासारखं वातावरण आहे.

advertisement

बॉलिवूडची सर्वात हॉरर फिल्म, भुताटक्या हॉटेलमध्ये झालेलं शूटिंग; रात्री यायचे किंचाळण्याचे आवाज, पाहून उडेल थरकाप

हॉस्पिटलबाहेर चाहत्यांचा हैदोस

मात्र, ही आनंदाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरातील अपोलो हॉस्पिटलबाहेर चाहत्यांनी तुफान गर्दी केली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये राम चरण आपली मोठी मुलगी क्लिन कारा हिला कडेवर घेऊन हॉस्पिटलमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, चाहत्यांनी आणि फोटोग्राफर्सनी त्याला चहुबाजूंनी असं घेरलं की, त्याला पाऊल टाकणंही कठीण झालं होतं.

advertisement

आपल्या चिमुकल्या लेकीला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात राम चरणचा जीव टांगणीला लागला होता. समोरून येणारे कॅमेरे आणि ओरडणारे चाहते यांच्या गर्दीतून मार्ग काढताना त्याला मोठी कसरत करावी लागली.

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप

हा व्हिडिओ पाहून राम चरणच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आहे. "तो एक बाप आहे आणि त्याच्या कडेवर लहान बाळ आहे, हे तरी भान ठेवा," अशा कमेंट्सचा पूर आला आहे. अनेक चाहत्यांनी सेलिब्रिटींना अशा आनंदाच्या क्षणी प्रायव्हसी देण्याची कळकळीची विनंती केली आहे. हॉस्पिटलसारख्या ठिकाणी असा आरडाओरडा करणं कितपत योग्य आहे? असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.

बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत शुभेच्छांचा वर्षाव

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

राम चरणच्या घरी जुळ्या मुलांचं आगमन झाल्यामुळे जैकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ, अमेरिकन रॅपर राजा कुमारी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांनी या जोडीचं अभिनंदन केलं आहे. २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या राम आणि उपासनाला १० वर्षांनंतर पहिली मुलगी क्लिन कारा झाली होती आणि आता दोन वर्षातच त्यांना जुळी मुलं झाल्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
जुळ्या मुलांचा बाप झाला, पण लेकरांना बघायला जाताना राम चरणसोबत घडला भयंकर प्रकार, VIDEO VIRAL
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल