व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, रणबीर कपूर त्याच्या घराच्या गेटजवळ येतो. तो सर्वांना इथून बाहेर जा असं म्हणतोय. "बिल्डिंगवाले तक्रार करतील. तुम्ही बिल्डिंगमध्ये येऊ शकत नाही." रणबीर बराच वेळ पापाराझी रिक्वेस्ट करत असतो. शेवटी तो म्हणतो, "अरे माझे 12 वाजतील, इथे हे सगळं अलाउड नाहीये."
advertisement
त्यानंतर पापाराझी रणबीरला बिल्डिंगच्या बाहेरून त्याचे फोटो काढण्याची विनंती करतात. त्यावर रणबीर हो चालेल असं म्हणतो आणि उघडण्यास सांगतो. पापाराझींना शांत करण्यासाठी तो त्यांच्याबरोबर बाहेर जातो आणि बर्थडे सेलिब्रेट करतो. पापाराझींनी त्याच्यासाठी आणलेला खास केकही कापतो.
28 सप्टेंबरला रणबीरचा बर्थडे होता. रणबीर कपूरने त्याचा लाइफस्टाइल ब्रँड, आर्क्सच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लाईव्ह सेलिब्रेट केला होता. बर्थडे सेलिब्रेशनबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला, "मी खूप छान आहे. मी आज माझा संपूर्ण दिवस आलिया आणि राहासोबत घालवला, मी बाकी काहीही केलेलं नाही. राहाने मला वचन दिलं होतं की, ती मला 43किसेस देईल, म्हणून मी ते तिच्याकडून घेतले. तिने माझ्यासाठी एक सुंदर कार्ड बनवलं होतं, जे पाहून मी खूप इमोशनल झालो. माझा बर्थडे कम्प्लिट झाला."